बलौदाबाजार, 25 ऑगस्ट: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका माजी नगरसेवकानं आपल्या मित्राच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी नगरसेवक (Former BJP Corporator) मित्राच्या घरी गेल्यानंतर त्यानं आपल्या मित्राच्या पत्नीकडे शारीरिक संबंध (Demand Sexual Relation) ठेवण्याची मागणी केली. यानंतर संतापलेल्या महिलेनं संबंधित नगरसेवकाला चपलेनं मारहाण (Woman beat BJP Corporator) केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. पीडितेच्या नवऱ्यानं पीडितेला आवरण्याचा प्रयत्न केला. महिलेनं भाजप नगरसेवकाची चांगलीच धुलाई केली आहे.
लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपी माजी नगरसेवकाचं नाव सूर्यकांत ताम्रकर असून ही घटना छत्तीसगडच्या बलौदाबाजार जिल्ह्यातील आहे. आरोपी नगरसेवक अंदाजे 15 दिवसांपूर्वी आपल्या मित्राच्या घरी गेला होता. यावेळी त्यानं आपल्या मित्राच्या पत्नीलाच सेक्सची ऑफर दिली. तसेच वहिनी आणि दिरामध्ये असे संबंध चालतात, असं नगरसेवकानं म्हटल्याचा आरोपही महिलेनं केला. यामुळे महिला संतापली. तिने भाजप नगरसेवक सुर्यकांत ताम्रकरची चपलेनं चांगलीच धुलाई केली आहे. यावेळी पीडितेच्या पतीनं तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं नगरसेवकाला चांगलाच चोप दिला आहे.
Ex BJP Councillor Suryakant asked his friend's wife for sex.He apparently said that it's common for Bhabhi Devar to have sex.The woman who was furious about this thrashes both of them.This is from simga, Balodaazar district in Chattisgarh.#பாலியல்_ஜல்சா_கட்சி pic.twitter.com/T36sS8eoPj
— ஜெகதீஷ்.கோ (@Jaisajoints) August 24, 2021
हेही वाचा-भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या, प्रेमात धोका मिळाल्याचं कारण आलं समोर
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर, आरोपी नगरसेवकानं घटनेच्या 15 दिवसानंतर पुन्हा पीडितेकडं लैंगिक सुखाची मागणी केली. तसा मेसेजही आरोपीनं पीडितेला केला होता. यानंतर संतापलेली पीडित महिला एका तरुणीला सोबत घेऊन नगरसेवकाच्या मित्राच्या दुकानात पोहोचली. यावेळी पीडितेनं आरोपीला पुन्हा काठीनं मारहाण केली.
हेही वाचा-अश्लील VIDEO व्हायरल होताच BJP नेत्याचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?
त्यानंतर मात्र नगरसेवक आणि त्याच्या मित्रानं पीडित महिला आणि तरुणीला जमिनीवर आपटलं. तसेच दोघींचे केस पकडून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी संबंधित दुकानासमोर मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतील काहींनी आपल्या मोबाइलमध्ये घटनेचं चित्रिकरण केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhattisgarh, Crime news