मिळालेल्या माहितीनुसार, केरळ हायकोर्टातील (Keral Highcourt) खटल्यात पत्नीने कोर्टाक़डे (Divorce) घटस्फोटाची मागणी केली आहे. यामागील कारणं जेव्हा कोर्टासमोर मांडली गेली तेव्हा सर्वांच्याच अंगावर काटा आला. अशा अवस्थेत महिला त्या नराधमासोबत कशी राहत असेल असाच प्रश्न कोणासमोरही उपस्थित राहिल. यावेळी पीडित पत्नीने कोर्टासमोर आपला धक्कादायक अनुभव व्यक्त केला.
...अन् त्या दिवशी पत्नी कोलमडली
पत्नीने सांगितलं की, पतीने माझ्या वडिलांकडून अनेकदा पैशांची मागणी गेली आहे. त्यांच्या लग्नाना 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांत महिलेच्या वडिलांनी तिच्या पतीला तब्बल 77 लाख रुपये दिले आहे. लग्नानंतर त्याने वैद्यकीय नोकरी सोडली आणि रियल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनचा बिजनेस सुरू केला. ज्यात त्याला यश आलं नाही. पैशांव्यतिरिक्त पती तिला शारिरीक त्रासही देत होता. अनेकदा तिच्या मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करीत होता. इतकच नाही तर तिला अनैसर्गिक संबंध (Unnatural physical contact) ठेवण्याची जबरदस्तीही केली जात होती. एकेदिवशी पती खूप आजारी होती, तरीही त्याने तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे ज्या दिवशी महिलेच्या आईचा मृत्यू झाला होता, त्यादिवशी पतीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. या सर्व प्रकारामुळे महिला कोलमडून गेली होती.
हे ही वाचा-15वर्षांवरील वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणं बलात्कार? हाय कोर्टाचा निर्णय
एके दिवशी स्वत:च्या मुलासमोर त्याने पत्नीवर बलात्कार केला. हे सर्व प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पतीने पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. हे प्रकरण ऐकल्यानंतर कोर्टाने वैवाहिक बलात्काराच्या आधारावर दोघांना घटस्फोट मंजूर केला. याशिवाय कोर्टाने पतीची चांगलीच कानउघडणीही केली. वैवाहिक बलात्कारासाठी अद्याप शिक्षा नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: High Court, Kerala, Marriage, Rape