मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

उपचारांच्या बहाण्यानं लैंगिक चाळे करणारा भोंदू वैद्य गजाआड, पोलिसांनी रुग्ण बनून केला पर्दाफाश

उपचारांच्या बहाण्यानं लैंगिक चाळे करणारा भोंदू वैद्य गजाआड, पोलिसांनी रुग्ण बनून केला पर्दाफाश

अपत्य न होणाऱ्या नशेचं औषध (medicines) देऊन त्यांच्याशी लैंगिक चाळे (sexual activities) करणाऱ्या भोंदू वैद्याला पोलिसांनी अटक (police arrested) केली आहे.

  • Published by:  desk news

रायपूर, 12 ऑगस्ट : अपत्य न होणाऱ्या नशेचं औषध (medicines) देऊन त्यांच्याशी लैंगिक चाळे (sexual activities) करणाऱ्या भोंदू वैद्याला पोलिसांनी अटक (police arrested) केली आहे. अपत्यप्राप्तीचं अमिष दाखवून तो विविध महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांना बेशुद्धीचं औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक चाळे करायचा.

महिलेनं केली तक्रार

छत्तीसगडमधील धमतरी भागात एक महिला अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत होती. लग्नाला 8 वर्षं होऊनही मूल होत नसल्याने ती अखेर या वैद्याकडे पोहोचली. त्यानं तिला तीन वेळा स्वतःकडे बोलावून औषध दिलं. पहिल्या दोन वेळा औषध घेतल्यानंतर ती पूर्ण बेशुद्ध झाली होती. मात्र तिसऱ्या वेळी ती भानावर होती. अशा अवस्थेत वैद्य आपल्यासोबत दुष्कृत्य करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने या प्रकाराला आक्षेप घेतल्यानंतर भांबावलेल्या वैद्यानं तिला ही बाब उघड न करण्याची धमकी दिली. आपण अपत्यप्राप्तीसाठीच प्रयत्न करत असल्याचं सांगत ही बाब उघड झाल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.

पोलिसांत तक्रार

या प्रकाराने हादरलेल्या महिलेनं सुरुवातीला मौन धारण केलं. मात्र या घटनेनंतर आठ दिवसांनी तिने पोलिसांत याची तक्रार दाखल केली. 29 ऑक्टोबर 2020 रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस या वैद्याच्या मागावर होते.

हे वाचा -दोघांच्या भांडणात गेला तिसऱ्याचाच जीव, वीटनं हल्ला करत केली हत्या

असा लागला शोध

या तक्रारीनंतर भोंदू वैद्य गायब झाला होता. तो सतत आपला मोबाईल नंबर बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी हा वैद्य गरियाबंद आणि अभनपूर भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रुग्ण असल्याचं सांगत त्याच्याशी संपर्क साधला. उपचार करायला नकार देणारा हा वैद्य जास्त पैशांचं अमिष दाखवताच तयार झाला आणि त्यानं भेटीची वेळ दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी या भोंदू वैद्याला अटक केली, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Chattisgarh, Crime