मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'अरे चोर नव्हे, मी बाबुराव बोलतोय...'; तरीही तरुणींनी केली धुलाई

'अरे चोर नव्हे, मी बाबुराव बोलतोय...'; तरीही तरुणींनी केली धुलाई

बिचारा बाबुराव सांगत राहिला पण कोणी त्याचं ऐकलं नाही आणि तरुणींनी त्याला चांगलाच चोप दिला.

बिचारा बाबुराव सांगत राहिला पण कोणी त्याचं ऐकलं नाही आणि तरुणींनी त्याला चांगलाच चोप दिला.

बिचारा बाबुराव सांगत राहिला पण कोणी त्याचं ऐकलं नाही आणि तरुणींनी त्याला चांगलाच चोप दिला.

  • Published by:  Meenal Gangurde

बेळगाव, 12 जुलै : राजस्थानमधील (Rajasthan) बाबुरावाला एक गोष्ट महागात पडली. बिचारा तरुणींना सांगत राहिला, की तो चोर नाही तर तो बाबुराव आहे. मात्र कोणीच त्याचं ऐकलं नाही. आणि त्याची चांगलीच धुलाई झाली. त्याचं झालं असं की, राजस्थानमधील  हा तरुण अनगोळमधील एका कंत्राटदाराकडे सेंट्रिगचे काम करतो. त्या दिवशी तरुणाचं मालकासोबत जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात तो भरपूर दारू प्यायला आणि एका लेडिज हॉस्टेलमध्ये (Girl's Hostel) घुसला. (Belgaum News)

त्याला पाहताच तरुणी चोssर...चोssर ओरडू लागल्या. त्यानंतर सुरक्षारक्षकही धावत आला आणि त्याची चांगलीच धुलाई केली. तो मार खाताना सांगत होता की, अहो मी चोर नाही..मी बाबुराव..पण बाबुरावचं कोणी ऐकेना. (Baburao entered the Girls Hostel under the influence of alcohol after which he was beaten)

चांगलीच धुलाई केल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांची त्याची चौकशी केली तेव्हा कळाचं की तो खरंच चोर नव्हता. बाबु नावाचा तरुण अनगोळमधील बिल्डरकडे कामाला आहे. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे कामावर आला. मात्र त्यावेळी मालकासोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर तो रागाच्या भरात बारमध्ये गेला आणि भरपूर दारू प्यायला. इतकं प्यायला की त्याला काहीच कळत नव्हतं. दिवसभर बाबुराव दारू पित होता आणि शेवटी तो अनगोळमधून फिरत फिरत थेट रामदेव हॉटेलमध्ये पोहोचला.

हे ही वाचा-बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत बारमध्ये लूट; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

लेडीज हॉस्टेलमध्ये घुसला आणि...

रात्री अकराच्या सुमारात तो रामदेवजवळील बारमधून बाहेर पडला आणि धर्मनाथ भवनकडे निघाला. तेथे त्याला एका कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलचे फाटक उघडे दिसले. तो तिथं घुसला. धडपड ऐकून तरुणी जाग्या झाल्या. आणि खोलीबाहेर आल्या. तेव्हा बाबुराव झोकांड्या देत असल्याचं दिसलं. त्याला पाहताच तरुणी चोर चोर ओरडू लागले. तेव्हा सुरक्षारक्षक धावत आला. त्यांनी बाबुरावला पकडलं आणि चोर समजून सुरक्षारक्षकाने त्याला चांगलच झोडपलं. बाबुराव केवळ एकच गोष्ट सांगत होता, तो म्हणत होता की, मै बाबू हूँ...त्याला दुसरं काहीच बोलता येत नव्हतं. रात्री 12 च्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

पोलिसांनी त्याला ठाण्यात बसवून ठेवलं. दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यानंतर तो समोर पोलिसांना पाहून घाबरला. त्यानंतर बाबुरावने पोलिसांना सर्व माहिती सांगितली. ते ऐकून पोलिसांनाही हसू आवरेना. याची खात्री पटविण्यासाठी त्याने मालकाला बोलावून घेतलं. मालकाने तो आपला कामगार असल्याचं सांगितलं आणि कागपत्रेही दाखवली. त्यानंतर कुठे बाबुरावची सुटका झाली.

First published:

Tags: Alcohol, Crime