• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • 14 वर्षांपासून मुकेश अंबानी नंबर वन; सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या यादीत 6 नव्या लोकांची एन्ट्री, कोण आहेत व्यावसायिक

14 वर्षांपासून मुकेश अंबानी नंबर वन; सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या यादीत 6 नव्या लोकांची एन्ट्री, कोण आहेत व्यावसायिक

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. 2008 पासून त्यांनी आपला हा पहिला नंबर कायम ठेवला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : Forbes ने भारतातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. वाढत्या शेअर बाजाराने 2021 च्या सदस्यांच्या एकत्रित संपत्तीला चालना दिली. फोर्ब्सने भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर करत 775 डॉलर्सची नोंद केली आहे. मागील 12 महिन्यात यात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. 2008 पासून त्यांनी आपला हा पहिला नंबर कायम ठेवला आहे. मागील 14 वर्षांपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची संपत्ती 92.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सलग तिसऱ्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्सवरुन 74.8 अब्ज डॉलर्स अशी जवळपास तीन पटीने वाढली आहे. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स वाढल्याने त्यांना हा फायदा झाला. सॉफ्टवेअर कंपनी HCL टेक्नोलॉजीचे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी देशातील उत्तम तंत्रज्ञान क्षेत्रातून 10.6 अब्ज डॉलर्सची संपत्ती वाढवली आणि आता 31 अब्ज डॉलर्ससह ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यानंतर राधाकिशन दमानी हे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 15.5 अब्ज डॉलर्सवरुन 29.4 अब्ज डॉलर्स अशी जवळपास दुप्पट झाली आहे.

    डोनाल्ड ट्रम्प आता ‘तेवढे’ श्रीमंत राहिले नाहीत, FORBES च्या यादीतून बाहेर

    भारताने आतापर्यंत 870 मिलियनहून अधिक कोरोना लशी दिल्या आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापन केलेले अब्जाधिश सायरस पुनावाला हे 19 अब्ज डॉलर्स संपत्तीसह पहिल्या पाच श्रीमंत भारतीय लोकांच्या यादीत पोहोचले आहेत. यावर्षी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सहा नव्या नावांची नोंद झाली आहे. कोण आहेत टॉप 10 श्रीमंत भारतीय - 1. मुकेश अंबानी - US$92.7 billion 2. गौतम अदानी - $74.8 billion 3. शिव नाडर - $31 billion 4. राधाकिशन दमानी - $29.4 billion 5. सायरस पुनावाला - $19 billion 6. लक्ष्मी मित्तल - $18.8 billion 7. सावित्री जिंदाल - $18 billion 8. उदय कोटक - $16.5 billion 9.  पालोनजी मिस्त्री - $16.4 billion 10. कुमार बिर्ला - $15.8 billion
    Published by:Karishma
    First published: