मराठी बातम्या /बातम्या /देश /धरणात पडला अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल, शोधण्यासाठी 21 लाख लिटर पाणी वाया घालवलं, शेवटी...

धरणात पडला अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल, शोधण्यासाठी 21 लाख लिटर पाणी वाया घालवलं, शेवटी...

15 फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यात अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल पडला (प्रतिकात्मक फोटो)

15 फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यात अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल पडला (प्रतिकात्मक फोटो)

एका फोनसाठी वाया घालवलेल्या या पाण्यात दीड हजार एकर शेत भिजवता आलं असतं. एवढं करून अधिकाऱ्याचा मौल्यवान मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला आहे.

रायपूर 26 मे : पंखाजूरमध्ये एका अन्न निरीक्षकाने पाण्यात पडलेला आपला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी धरणातील लाखो लिटर पाणी सोडून दिलं. एका फोनसाठी वाया घालवलेल्या या पाण्यात दीड हजार एकर शेत भिजवता आलं असतं. एवढं करून अधिकाऱ्याचा मौल्यवान मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला आहे.

कोयलीबेडा ब्लॉकचे फूड ऑफिसर रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. खेरकट्टा परळकोट जलाशयाच्या ओव्हर ब्रिजवर 15 फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यात अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल पडला.

अधिकाऱ्याने आधी जवळच्या गावकऱ्यांना मोबाईल शोधण्यात गुंतवलं. चांगले गोताखोर उतरले. मात्र फोन सापडला नाही. त्यानंतर फोन शोधण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर 30 एचपी क्षमतेचा पंप बसवून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आलं. गेल्या तीन दिवसांपासून पाणी काढण्यासाठी पंप सुरू होता.

पत्नीने चिकन बनवण्यास दिला नकार, नाराज पतीने स्वतःचाच करून घेतला भयानक शेवट

जलाशयातून सातत्याने पाणी उपसा होत असल्याची बाब वरपर्यंत पोहोचल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हा पंप बंद करायला लावला. त्यानंतर पुन्हा शोध घेतला असता मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला होता.

अंदाजानुसार, गेल्या सोमवार ते गुरुवारपर्यंत सलग 24 तास 30 हॉर्स पॉवरच्या दोन डिझेल पंपांमुळे सुमारे 21 लाख लिटर पाणी वाया गेलं. हे पाणी दीड हजार एकर जमीन सिंचनासाठी पुरेसं होतं. आता प्रश्न असा पडतो की त्या अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये काय होतं? ज्यासाठी सिंचनासाठी वापरलं जाणारं पाणी एवढ्या प्रमाणात वाया घालवण्यात आलं.

या प्रकरणी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी राम लाल ढिंवर यांचं म्हणणं आहे की, 5फुटांपर्यंत पाणी काढण्याची परवानगी तोंडी देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत 10 फुटांपेक्षा जास्त पाणी काढण्यात आलं आहे. मात्र, एवढ्या कडक उन्हाळ्यातही सिंचनाच्या पाण्याची नासाडी केली गेली.कदाचित परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनापेक्षा अधिकाऱ्याच्या महागड्या फोनची किंमत जास्त आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mobile Phone, Shocking news