मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पत्नीने चिकन बनवण्यास दिला नकार, नाराज पतीने स्वतःचाच करून घेतला भयानक शेवट

पत्नीने चिकन बनवण्यास दिला नकार, नाराज पतीने स्वतःचाच करून घेतला भयानक शेवट

चिकन बनवण्यावरुन सुरू झालेलं भांडण अतिशय टोकाला पोहोचलं

चिकन बनवण्यावरुन सुरू झालेलं भांडण अतिशय टोकाला पोहोचलं

पतीने चिकन बनवण्यास सांगितलं होतं, मात्र पत्नीने जेवण तयार असल्याचं सांगत चिकन बनवण्यास नकार दिला अन् मग..

लखनऊ 26 मे : पती-पत्नीमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत असतात. मात्र कधीकधी हे वाद अगदी टोकाला पोहोचतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये किरकोळ कारणावरून संतापलेल्या पतीने आत्महत्या केली. पतीने चिकन बनवण्यास सांगितलं होतं, मात्र पत्नीने जेवण तयार असल्याचं सांगत चिकन बनवण्यात नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण झालं. संतापलेल्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली.

हे प्रकरण झाशीच्या प्रेम नगर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. येथील हंसारी येथील पवन शाक्य हे फर्निचर बनविण्याचे काम करतात. 4 वर्षांपूर्वी त्याचा प्रियंकासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांना एक मुलगी झाली. सगळं सुरळीत चाललं होतं पण कधी कधी नवरा बायकोमध्ये भांडण व्हायचं. पवनचं मद्यपान हे भांडणाचं कारण होतं.

नाश्त्याच्या पैशावरून गोंधळ; तीन महिलांनी मिळून तरुणीला चोप चोप चोपलं, पाहा Video

काल रात्री पवन चिकन घेऊन घरी आला आणि त्याने पत्नीला ते शिजवण्यास सांगितले. पत्नी प्रियांकाने आधीच जेवण बनवलं होतं. त्यामुळे तिने नकार दिला. मात्र फक्त चिकनच खायचं यावर पवन ठाम होता. पवनने चिकन बनवण्याचा हट्ट सुरू केल्यावर दोघांमध्ये भांडण सुरू झालं. भांडणाचं रुपांतर मारामारीत कधी झालं ते कळलंही नाही.

पवनच्या मारहाणीमुळे संतापलेली पत्नी प्रियंका दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली. पवनने दुसऱ्या खोलीचा दरवाजाही आतून बंद केला. रात्री गच्चीवर झोपलेला मोठा भाऊ कमलेश खाली आला असता त्याने पवनच्या खोलीचा दरवाजा अनेकदा ठोठावला. मात्र पवन खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने त्याने आपल्या मुलीला खिडकीतून खोलीत पाहण्यास पाठवलं.

तिने येऊन सांगितलं की काका खुंटीला लटकले आहेत आणि काहीही उत्तर देत नाहीत. पवन खुंटीला लटकलेला पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना कळवलं आणि पोलीस आल्यावर दरवाजा उघडला असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन केलं आहे. पवनला 2 वर्षांची मुलगी आहे. त्याचे वडील रघुवीर यांचे आधीच निधन झाले आहे. पवन हा तीन भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होता. त्याचा एक भाऊ सैन्यात आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking news