मराठी बातम्या /बातम्या /देश /

Flipkartला दणका! निकृष्ट दर्जाची उत्पादनं विकल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड; ग्राहकांना पैसे परत देण्याचे आदेश?

Flipkartला दणका! निकृष्ट दर्जाची उत्पादनं विकल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड; ग्राहकांना पैसे परत देण्याचे आदेश?

फ्लिपकार्टवरून विकल्या गेलेल्या सर्व 598 प्रेशर कुकर्सच्या ग्राहकांना सूचित करून, ते परत मागवावेत आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावेत, असे निर्देश CCPAने फ्लिपकार्टला दिले आहेत. काय आहे यामगचं कारण जाणून घ्या.

फ्लिपकार्टवरून विकल्या गेलेल्या सर्व 598 प्रेशर कुकर्सच्या ग्राहकांना सूचित करून, ते परत मागवावेत आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावेत, असे निर्देश CCPAने फ्लिपकार्टला दिले आहेत. काय आहे यामगचं कारण जाणून घ्या.

फ्लिपकार्टवरून विकल्या गेलेल्या सर्व 598 प्रेशर कुकर्सच्या ग्राहकांना सूचित करून, ते परत मागवावेत आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावेत, असे निर्देश CCPAने फ्लिपकार्टला दिले आहेत. काय आहे यामगचं कारण जाणून घ्या.

मुंबई, 17 ऑगस्ट : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशातली मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला दणका दिला आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेकडो निकृष्ट घरगुती प्रेशर कुकरच्या (Substandard Pressure Cookers) विक्रीला परवानगी दिल्याबद्दल कंपनीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सोबतच, फ्लिपकार्टवरून विकल्या गेलेल्या सर्व 598 प्रेशर कुकर्सच्या ग्राहकांना सूचित करून, ते परत मागवावेत आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावेत, असे निर्देश CCPAने फ्लिपकार्टला दिले आहेत. CCPAच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या नेतृत्वाखाली एका पॅनेलने ही कारवाई केली. या आदेशाचं पालन करण्यासाठी फ्लिपकार्टला 45 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर कंपनीला एक अहवालदेखील सादर करावा लागणार आहे. ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आज (17 ऑगस्ट 2022) एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. प्राधिकरणाने नोंदवलं, की ‘फ्लिपकार्ट टर्म्स ऑफ यूसेज’मधल्या (Flipkart fined by CCPA) तरतुदींनुसार, उत्पादनाच्या प्रत्येक इनव्हॉइसवर ‘पॉवर्ड बाय फ्लिपकार्ट’ या शब्दांचा वापर करणं अनिवार्य आहे. तसंच, विक्रेत्यांना गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशा प्रकारांमध्ये विभागणं अशा गोष्टी प्रेशर कुकर असो किंवा इतर उत्पादनांच्या विक्रीमध्ये कंपनीची भूमिका स्पष्ट करतात. त्यामुळेच “कंपनीला निकृष्ट प्रेशर कुकरची विक्री करण्यास परवानगी दिल्याबद्दल आणि ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असं CCPAने स्पष्ट केलं. हेही वाचा - 5G services in India: मुंबई-पुणेकरांसाठी खूशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होणार 5G सेवा प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टने अशा प्रेशर कुकर्सच्या विक्रीमधून एकूण 1,84,263 रुपयांची कमाई केली आहे. “अशा प्रकारे त्यांनी फायदा मिळवला आहे, तेव्हा ग्राहकांना त्यांच्या विक्रीमुळे उद्भवलेल्या त्रासाच्या जबाबदारीपासून ते स्वतःला दूर करू शकत नाहीत,” असं प्राधिकरणाने स्पष्ट केलं. गेल्या वर्षी एक फेब्रुवारी रोजी लागू झालेला डोमेस्टिक प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश सर्व प्रेशर कुकर्ससाठी IS 2347:2017 या नियमाचं पालन अनिवार्य करतो. त्यामुळेच ऑनलाइन किंवा ऑफलाइन विक्रीसाठी असलेले सर्व प्रेशर कुकर्स या नियमाचं पालन करतात की नाही हे तपासणं आवश्यक आहे. “केंद्र सरकार वेळोवेळी ग्राहकांच्या हितासाठी, तसंच, ग्राहकांना दुखापत आणि हानी होण्याच्या जोखमीपासून बचावासाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) सूचित करत असते. यानुसार मानक आणि मानक चिन्हांचा वापर करणं आवश्यक ठरतं,” असं प्राधिकरणाच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे. ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी CCPAने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ते सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि बनावट वस्तूंची विक्री रोखण्यावर भर देत आहेत. यामध्ये विशेषतः घरगुती प्रेशर कुकर, हेल्मेट आणि स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर अशा गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय मानक ब्युरोने अनिवार्य मानकांशी जुळत नसणारे 1,435 प्रेशर कुकर्स आणि 1,088 हेल्मेट्स जप्त केली असल्याचं CCPAने सांगितलं.
First published:

Tags: Business, Business News

पुढील बातम्या