देशात 5G इंटरनेट सेवेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येकजण 5G सेवा सुरू होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात 29 सप्टेंबर रोजी देशात 5G सेवा सुरु होणार असल्याचं म्हटलं होतं.
इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022च्या उद्घाटनावेळी भारतात 5G सेवा अधिकृतपणे सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
एअरटेल आणि जिओ देशामध्ये 5G सेवा सुरु करण्यासाठी सज्ज आहेत, असं दोन्ही कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
देशातील अहमदाबाद, बंगळुरु, चंदिगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पुणे या शहरांमध्ये 5G सेवा दिली जाऊ शकते.