सरकारी कार्यालयात दिली शिंक, पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

सरकारी कार्यालयात दिली शिंक, पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

सरकारी कार्यालयात शिंक (Sneeze) आली म्हणून पाच युवकांनी पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी रक्षक दलाच्या 26 वर्षीय जवानाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

  • Share this:

अहमदाबाद 8 फेब्रुवारी : गुजरातच्या अहमदाबादमधून एक (Ahmadabad) धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात शिंक (Sneeze) दिली म्हणून पाच युवकांनी या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी रक्षक दलाच्या 26 वर्षीय जवानाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर नरोडा पोलिसांनी पाच जणांविरोधात मारहाण आणि शिव्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पोलीस(Police) जवान सरकारी कामकाजानिमित्त सरकारी कार्यालयात आला होता. यावेळी त्याठिकाणी त्याला शिंक (Sneeze)  आली. यानंतर त्याठिकाणी असणाऱ्या दोन युवकांनी त्याला शिव्या देत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानं आपण पोलीस असून सरकारी कामकाजानिमित्त आल्याचं सांगितलं. परंतु, आरोपींनी त्याचं काहीही ऐकून न घेता आपल्या आणखी 3 साथीदारांना बोलवत आणखी मारहाण केली. शिंक ही अशुभ असल्याचं म्हणत आरोपींनी मारहाण केल्याचं मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं.

याठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आरोपींच्या तावडीतून या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली. यामध्ये या कर्मचाऱ्याच्या नाकाला मोठी इजा झाली आहे, तर डोळ्यालादेखील गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अहमदाबाद मिररला दिलेल्या मुलाखतीत, नाकाला मोठी दुखापत झाली असून डोळ्याजवळ टाकेदेखील पडले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी भारत भारवाड, विपुल भारवाड, संजय भारवाड, रवि भारवाड आणि  जगदीश भारवाड या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर पुढील तपास सुरु असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 8, 2021, 2:22 PM IST

ताज्या बातम्या