श्रीनगर 18 जून : जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 24 तासांत सौम्य तीव्रतेचे 5 भूकंप आले. त्यापैकी 4.5 तीव्रतेचा भूकंप सर्वात मोठा होता. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दुपारी 2 वाजून 03 मिनिटांनी 3.0 तीव्रतेच्या भूकंपानंतर पहिला हादरा जाणवला. कटरा येथे रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी होती. आज पहाटे 3 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास पुन्हा भूकंप झाला. कटरा येथे 11 किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी लडाखच्या लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ईशान्य लेहमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंप दुपारी 2.16 वाजता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. याआधी शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी 2.03 वाजता झालेल्या 3.0 तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डोंगराळ रामबन जिल्ह्यात होता. खरंच प्राणी-पक्षांना भूकंपाआधीच लागते चाहूल? काय आहे यामागचं रहस्य ते म्हणाले की भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किमी खाली 33.31 अंश उत्तर अक्षांश आणि 75.19 अंश पूर्व रेखांशावर होती. लडाखमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होती. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात 10 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.4 इतकी होती. याआधी 13 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 मोजली गेली होती. यादरम्यान घरांनाही भेगा पडल्याचे दिसून आले. डोडा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांतील हा सातवा भूकंप होता. जम्मू-काश्मीरमधील रामबन आणि डोडा जिल्ह्यात शनिवारी दोन सौम्य तीव्रतेचे भूकंप झाले. मिळालेल्या माहितीनुसार, चिनाब खोऱ्यात आठ तासांत 3.0 रिश्टर स्केल आणि 4.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी दुपारी 2.03 च्या सुमारास 3.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला, ज्याचा केंद्रबिंदू जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डोंगराळ रामबन जिल्ह्यात होता. भूकंपाच्या खोलीबद्दल बोलायचं झाल्यास, तो 33.31 अंश उत्तर अक्षांश आणि 75.19 अंश पूर्व रेखांशावर पृष्ठभागापासून पाच किलोमीटर खाली होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.