जाहिरात
मराठी बातम्या / Viral / खरंच प्राणी-पक्षांना भूकंपाआधीच लागते चाहूल? काय आहे यामागचं रहस्य

खरंच प्राणी-पक्षांना भूकंपाआधीच लागते चाहूल? काय आहे यामागचं रहस्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तुम्ही लोकांना बऱ्याचदा असे बोलताना ऐकलं असेल की प्राणी आणि पक्ष्यांना भूकंपाची आधीच माहिती मिळते. पण हे किती सत्य आहे?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी भूकंपाने हाहाकार माजवला. अजूनही तेथे बचाव कार्य सुरु आहे. त्यात मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. या भूकंपात आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर बरेच लोक जखमी झाले आहेत. हे बचावकार्य जसजसे पुढे सरकत जाईल तसतसा हा आकडा आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेदरम्यानचा पहाटेच्या वेळी पक्ष्यांचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भूकंपाच्या आधी पक्षी इकडे तिकडे पळताना दिसत आहे. या पक्षांचा आवाज आणि गोंधळ ऐकूनच हे स्पष्ट होत आहे की त्यांना काहीतरी भयानक घडणार आहे, याची चाहूल लागली असावी. हे ही पाहा : तुम्हाला माहितीयत जगातील असे देश ज्यांची कोणतीही सेना नाही? भूकंप होण्यापूर्वी हे पक्षी आपले घर सोडून आकाशात घिरट्या घालू लागले होते, असे सांगितले जात आहे. तसेच तुम्ही लोकांना बऱ्याचदा असे बोलताना ऐकलं असेल की प्राणी आणि पक्ष्यांना भूकंपाची आधीच माहिती मिळते. पण हे किती सत्य आहे? खरंच असं होतं काय, चला या रहस्याबद्दल जाणून घेऊ. ज्योतिषांच्या मते, भूकंप होण्यापूर्वी पाण्यातील मासे आणि बेडूक यांना याची माहिती मिळते. ते पाण्याच्या मध्यभागी सोडून किनाऱ्याकडे धावू लागतात. मांजरी अचानक रडायला लागतात आणि कुत्रे भुंकायला लागतात. साप आपल्या बिळातून बाहेर येतो आणि इकडे तिकडे धावू लागतो. पक्षी आणि कबुतरांमध्ये खळबळ उडते. पण या मागे विज्ञान देखील आहे. असे अनेक प्राणी, पक्षी आहेत, ज्यांना भूकंप होण्यापूर्वीच ते येणार आहे असं जाणवते (Animals and Birds on Earthquake). याचे कारण आहे की पक्षी आणि प्राण्यांना कमी वारंवारतेच्या ध्वनी लहरी ऐकू येतात. ते अगदी दुरवचं देखील ऐकू शकतात. त्या तुलनेत मानवी कान हे कमी वारंवारतेच्या ध्वनी लहरी ऐकू शकत नाहीत, तर प्राणी आणि पक्ष्यांसाठी या ध्वनी लहरी भयावह आवाजासारख्या असतात. त्यामुळेच या आवाजाला घाबरून ते इकडे तिकडे धावू लागतात.

News18लोकमत
News18लोकमत

ज्योतिषी म्हणतात की या प्राण्यांना केवळ भूकंप जाणवत नाहीत तर त्यांना ज्वालामुखीचा उद्रेक किंवा त्सुनामी आल्याची ही जाणीव अगोदरच होते. वास्तविक त्यांना पृथ्वीच्या आत होत असलेल्या सूक्ष्म लहरी आणि हालचाली आधीच जाणवतात. त्यामुळे ते मानवाला त्यांच्या विचित्र वागण्यातून सावध करतात. तसेच ते अशा आपत्तींना तोंड देण्याची तयारी देखील सुरु करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात