नवी दिल्ली, 24 जुलै : भारताने तयार केलेली कोरोना लस (CORONA VACCINE) कोवॅक्सिनची (COVAXIN) मानवी चाचणी (HUMAN TRIAL) सुरू झाली आहे. देशभरातील 12 संस्थांमध्ये या लशीच्या ह्युमन ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीतील एम्समध्ये (DELHI AIIMS) आजपासून या लशीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिली लस 30 वर्षांच्या व्यक्तीला देण्यात आली आहे आणि या लशीचा काय परिणाम झाला याबाबत महत्त्वपूर्ण माहिती एम्सने दिली आहे. एम्समधील या ह्युमन ट्रायलचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी एएनआयला माहिती देताना सांगितलं, “दिल्लीतल्या 30 वर्षीय व्यक्तीला आम्ही कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला. कोरोनाची लस घेणारी ही पहिली व्यक्ती आहे. दोन दिवसांपूर्वी त्याची आरोग्य तपासणी झाली आणि तो पूर्णपणे निरोगी आहे, त्याला कोणतीही समस्या किंवा आजार नाही. “लस दिल्यानंतर त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही”
COVID-19: AIIMS administers first dose of COVID-19 candidate vaccine `Covaxin' to 30-year-old Delhi resident
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2020
Read @ANI Story | https://t.co/q7zqIbW0vc pic.twitter.com/pxxV5433Am
आता लस दिलेल्या या 30 वर्षीय व्यक्तीला दोन आठवडे मॉनिटर केलं जाईल. त्यानंतर त्याला दुसरा डोस दिला जाईल. हे वाचा - कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतील ‘भाभीजी पापड’; भाजप मंत्र्याचा अजब दावा आणखी 10 जणांना टप्प्याटप्प्याने लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लस दिल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो त्याचा अहवाल ट्रायलच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या समिताला पाठवला जाईल आणि मग अशाच प्रकारे 100 निरोगी व्यक्तींना पहिल्या टप्प्यातील डोस दिला जाईल, अशी माहिती एम्सने दिली आहे. कोरोना लशीशिवाय तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का? View Survey हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यातील नेशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसह मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर या लशीच्या ह्युमन ट्रायलला CDSCO करून परवानगी मिळाली आणि लशीचं ह्युमन ट्रायल सुरू झालं. देशातल्या विविध राज्यांमधल्या 12 हॉस्पिटल्समध्ये या लशीची चाचणी केली जाते आहे. हे वाचा - मुंबईत कोरोनाचा आलेख झाला सपाट; पण सावधान पावसामुळे पुन्हा वाढू शकतो धोका पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायलमध्ये 375 जणांना कोरोना लस दिली जाणार आहे. त्यापैकी 100 जणांवर दिल्लीतील एम्समध्ये चाचणी होईल. इतर सदस्यांवर या लशीच्या ट्रायलसाठी मान्यता देण्यात आलेल्या इतर संस्थांमध्ये चाचणी केली जाईल. एम्समध्ये या ट्रायलसाठी 3,500 पेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे, त्यांची आरोग्य तपासणी केली जाते आहे. असंही डॉ. राय यांनी सांगितलं