Home /News /viral /

कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतील 'भाभीजी पापड'; भाजप मंत्र्याचा अजब दावा

कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतील 'भाभीजी पापड'; भाजप मंत्र्याचा अजब दावा

भाजप मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात.

    नवी दिल्ली, 24 जुलै : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी सोशल मीडियावर बरेच सल्ले दिले जात आहेत, कोरोनाबाबत गैरसमजही पसरवले जात आहे. असे चुकीचे सल्ले आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना आणि सरकार करत आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत आहे. अशात आता मोदी सरकारमधील मंत्र्यानेच कोरोनाव्हारसपासून बचावासाठी अजब असा सल्ला दिला आहे. कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी पापड मदत करतील, असा दावा या मंत्र्याने केला आहे. भाजपचे मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal यांनी कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी भाभीजी पापड (bhabhiji papad) मदत करतील असा दावा केला आहे. भाजप मंत्र्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.ट्वीटवर या व्हिडिओवर नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मेघवाल म्हणाले, "आत्मनिर्भर भारतअंतर्गत पापड उत्पादकाने असे पापड तयार केलेत जे कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी शरीरात अँटिबॉडीजची निर्मिती करण्यासाठी मदत करतील. कोरोनाव्हायरशील लढण्यासाठी हे पापड खूप फायदेशीर ठरतील" सध्या भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोना लशीवर (Corona Vaccine) संशोधन सुरू आहे. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, अँटिबॉडीज तयार करणारी, कोरोनापासून संरक्षण देणारी आणि बचाव करणारी लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. अशात भाजप मंत्र्याने फक्त पापडाने अँटिबॉडीजची निर्मिती होण्यासाठी मदत होईल, असा दावा केल्याने आश्चर्य वक्त केलं जातं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.भाभाजी पापड खाऊनच कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार होणार असतील तर मग कोरोना लशीवर वेळ कशाला खर्च करत आहात. लस बनवणं थांबवा अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर एकाने हे पापड खा, जीव वाचेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचा - अरे बापरे! आता CORONA आकार बदलून रोगप्रतिकारक प्रणालीला देतोय चकवा 'सध्या भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोना लशीवर (Corona Vaccine) संशोधन सुरू आहे. जगात चार लशी या फ्रंटरनर आहेत. या सर्व लशींच्या तिसऱ्या टप्याच्या चाचणीचे निकाल आल्यानंतर सर्व सामान्य लोकांकरिता ही लस उपलब्ध होणार आहे. भारतात लस उत्पादन आणि वितरणाचे सुदृढ जाळे आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ही लस पोहचण्याची अडचण येणार नाही,' अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. हे वाचा - अन्न विषबाधा झाल्यानंतर घरच्या घरी लगेच करता येण्यासारखे उपाय 'भारतात देखील कोरोना लस तयार होत आहे. या लशीच्या पहिल्या चाचणीचे निकाल आल्यानंतर सरळ तिसरी चाचणी करण्यात येणार आहे. यासोबतच लशीच्या तुलनेत औषधावरील संशोधन अतिशय प्रगत आहे. फेरमविर सारखे जेनेरिक औषध देशात उपलब्ध आहे. आगामी चार महिन्यात अजून काही औषधे उपलब्ध होणार आहेत,' असे मतही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या