मुंबईत कोरोनाचा आलेख झाला सपाट; पण सावधान पावसामुळे पुन्हा वाढू शकतो धोका

Mumbai: Health workers during a house-to-house health survey at Koliwada, after detection of COVID-19 positive cases, during the nationwide lockdown, at Dharavi in Mumbai, Friday, May 8, 2020. (PTI Photo)(PTI08-05-2020_000292B)

मुंबईत कोरोनाचा (mumbai coronavirus) वाढता आलेख झुकू लागला याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असं नाही, असं दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 24 जुलै : भारतातल्या काही ठिकाणी कोरोनाची (coronavirus) झपाट्याने वाढणारी प्रकरणं आता कमी होऊ लागली आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद इथं कोरोनाचा वाढता आलेख आता सपाट झाला आहे. मात्र याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असा नाही, पावसामुळे हा धोका पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता दिल्लीतील एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली आहे. भारतात कोरोनाव्हायरसने सर्वोच्च बिंदू (peak) गाठला आहे का? कोरोनाचा आलेख कसा आहे आणि पावसाळ्यात कोरोनाचा धोका किती आहे. याबाबत दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी न्यूज 18 ला माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, "भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कालावधीत कोरोना सर्वोच्च बिंदू गाठेल. दिल्लीमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे, जिथं कोरोना आलेखाची वक्ररेषा समांतर होऊ लागली आहे. मुंबई, अहमदाबाद आणि दक्षिणेकडील काही भागात कोरोनाचा आलेख झुकू लागला आहे. या ठिकाणी कोरोनाचं प्रमाण सर्वोच्च टोकावर पोहोचलं आणि आता तो खाली घसरू लागलं आहे. मात्र प्रकरणं कमी झाली तरी आपण त्याला गांभीर्याने घ्यायला हवं" "भारतातील अनेक भागात जिथं कोरोनाची प्रकरणं कमी झाली, त्या ठिकाणच्या लोकांना वाढलं आता आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे आणि आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं हे सर्व थांबवू शकतो यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सावध राहायला हवं", असं डॉ. गुलेरिया म्हणाले. कोरोना लशीशिवाय तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का? कोरोनाचं संक्रमण सध्या जरी कमी दिसत असलं तरी उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कोरोनाचा धोका अधिक असेल, याबाबत डॉ. गुलेरिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे वाचा - Corona चा मृत्यूदर आपल्याकडे कमी; भारतातल्या गर्दीनेच वाढली प्रतिकारशक्ती डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, "कोरोनाव्हायरस सामान्य वातावरणात दीर्घकाळासाठी राहतो आहे. उन्हाळ्यापेक्षा तो पावसाळ्यात आर्द्रतेमुळे जास्त काळ तग धरण्याची शक्यता आहे.  तसंच पश्चिमेकडे हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लहर येईल, अशी चिंता आहे. इन्फ्लूएंझा फ्लू भारतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वाढतो. 1980 मध्ये इन्फ्लूएंझा व्हायरसची हिवाळ्यात दुसरी लाट आली होती आणि त्यामुळे मृत्यूही जास्त झाले होते. मात्र कोरोनाव्हायरस वेगळा आहे. तो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कसा असेल हे स्पष्टपणे सांगू शकत नाही" हे वाचा - जगातल्या 7 देशांनी केली कोरोनावर मात, सर्व देशांच्या प्रमुख आहेत महिला नेत्या "मात्र तरी या कालावधीत आपण खबरदारी घ्यायला हवी. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आपण ज्या उपाययोजना करत आहोत त्या कायम ठेवायला हव्यात", असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे
    Published by:Priya Lad
    First published: