मराठी बातम्या /बातम्या /देश /

राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचं 'वजन', संजय राऊतांवर गुन्हा दाखल, राज्यात स्वाईन फ्लूचा विळखा TOP बातम्या

राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचं 'वजन', संजय राऊतांवर गुन्हा दाखल, राज्यात स्वाईन फ्लूचा विळखा TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 31 जुलै : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. यावरुन सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राज्यात कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. तर सांगलीच्या संकेत सरगरनेही रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा. आदित्य ठाकरे घेणार शंभूराज देसाईंच्या बालेकिल्ल्यात सभा! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा 1 ऑगस्टपासून सुरु होत आहे. आदित्य ठाकरे 2 ऑगस्टला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सभा घेणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अखेर शिवसेनेच्या ठाकरेंचा 'अर्जुन' शिंदे गटात करणार प्रवेश शिवसेनेतील उद्धव ठाकरेंचाअर्जुन अखेर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. यावेळी ते म्हणाले,  'काही परिस्थितीमुळे निर्णय घ्यावे लागतात. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गेले होते. त्यानंतर आज संध्याकाळी उशिरा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्यातच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. CWG 2022: मीराबाई चानूची 'सुवर्ण' कामगिरी भारताची स्टार वेटफिल्टर मीराबाई चानू हिने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 चे सुवर्णपदकही जिंकले आहे. 27 वर्षीय चानूने बर्मिंगहॅममधील तिचा ऑलिम्पिक विक्रमही सुधारला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्याला स्वाईन फ्लूचा विळखा मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने पालिका प्रशासनाकडून दिलासा व्यक्त केला जात होता. मात्र आतास्वाईन फ्लूनेडोकं वर काढल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मीरा भाईंदर परिसरातील विविध भागात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळून आले असून या रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सांगलीच्या पठ्ठ्यानं कष्टाचं चीज केलं! 21व्या वर्षी पदक संकेत महादेव सरगरने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे खाते उघडले आहे. त्याने वेटलिफ्टिंगच्या 55 ​​किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकापासून तो एक किलो दूर राहिला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sanjay raut, Sport, Swine flu in india

    पुढील बातम्या