जुनागड, 20 सप्टेंबर : जगाचा पोशिंदा अर्थात बळीराजा मोठ्या कष्टाने शेतात पिकं घेतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला तोंड देतो. पण, जीवापाड जपलेले पिकं न आल्यामुळे त्याला पेटवून देण्याची नामुष्की गुजरातमधील जुनागडमध्ये एका शेतकऱ्यावर आली. जुनागडातील माडिया हाटिनाच्या पानिघ्रा इथं राहणाऱ्या एका शेतकऱ्याने 30 एकर जमिनीत भुईमुग लावला होता. पण, मुसळधार पावसामुळे 10 लाख हेक्टर जमिनीत घेतलेले पिकं उगावलेच नाही. शेतीचं प्रचंड नुकसान झालं.
शेतकरी गिरिराज सिंह यांना प्रचंड नुकसानीचा फटका बसला आहे. गिरिराज सिंह यांनी मोठ्या मेहनतीने भुईमुगाचे पिक घेतले होते. पण पावसामुळे ते वाहून गेले. पावसामुळे भुईमुगांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे गिरिराज यांनी संपूर्ण पिक बाहेर काढावे लागले. आता या पिकाला मातीमोल भाव आला होता. त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी हाताने लावलेल्या पिकाला पेटवून दिले. VIDEO : यांना कोरोना आणि जीवाची भीतीच नाही, भररस्तत्यात सुरू आहे स्टंटचा थरार भुईमुगांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे पेरणीचा खर्चही वसूल झाला नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारने शेतीचे पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. ‘यंदा मोठ्या आशेनं भुईमुगांचे पिक घेतले होते. पण, पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व पिक वाया गेले आहे. खतं, पेरणीचा खर्चही हाती आला नाही. आता हे पिक फेकून देण्यासाठी ट्रॅक्टरचे भाडेही परवडणारे नव्हते. त्यामुळे शेतातच पिक बाहेर काढून पेटवून द्यावे लागले’, असं या गिरिराज या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली.