मुंबई, 20 सप्टेंबर : देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसाला 92 हजार नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असताना मात्र अनेक लोक अजूनही विनामास्क आणि कामाशिवाय घराबाहेर फिरताना दिसत आहेत. काही तरुणांनी तर कोरोनाच्या या महासंकट काळात अगदी हद्दच गाठली आहे. सगळे नियम धाब्यावर बसवून भररस्त्यात दुचाकीवर स्टंट केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की यातील काही तरुणांनी मास्क आणि हेलमेटही घातलं नाही. याशिवाय जीवघेणे स्टंट हे बाईकवर भररस्त्यात मध्यभागी सुरू आहेत. या तरुणांना कोरोना आणि जीवाची भीती नाही हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. काही तरुणांनी तर मास्कही न घालता बिनधास्त स्टंटबाजी केली आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बिनधास्त रस्त्यावर स्टंट सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा- एका दिवसात समोर आले 92 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांचा आकडाही हजाराच्या वर न्यूज 18 ला मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ देशाची राजधानी दिल्लीमधला असल्याची माहिती मिळत आहे. वाहतुकीचे आणि कोरोना काळातील नियमांना डावलून बिनधास्त हे तरुण स्टंट करताना दिसत आहेत. अशा प्रकारचे स्टंट जीवावर बेतू शकतात याची जाणीव असतानाही हा प्रकार दिल्लीत रविवारी सकळी उघडला. गाड्यांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी असे स्टंट करणाऱ्याच्या आणि इतर प्रवाशांच्या धोक्याचे ठरू शकले असते. सुदैवानं कोणता अनर्थ घडला नाही. अशा प्रकारे कोरोनाला अगदी हलक्या स्वरुपाचं समजू बिनबोभाट फिरायला लागलं तर खरंच कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो याशिवाय असे विना मास्क आणि हेल्मेटने जीवावर बेतणारे स्टंट अंगाशी येऊ शकतात. जीव धोक्यात घालून हे स्टंट करू नये आणि कोरोनाच्या आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन आपल्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी करायला हवं हे न्यूज 18 लोकमत नागरिकांना आवाहन करत आहे.