कृषी बिलाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश, आंदोलनादरम्यान तरुणानं केलेल्या स्टंटचा VIDEO VIRAL

कृषी बिलाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश, आंदोलनादरम्यान तरुणानं केलेल्या स्टंटचा VIDEO VIRAL

बॅरिकेट्स तोडून येणाऱ्या शेतकऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि वॉटर कॅनॉनचा वापर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या या विरोधाचे, आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु या आंदोलकांपैकी एका तरुणाचा या आंदोलनातील सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : कृषी कायद्यात (Farms Law 2020) बदल करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांची निदर्शनं सुरू आहेत. देशात केंद्र सरकारविरोधात (Central Government) असंतोष असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी देशातील अनेक भागात कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बॅरिकेट्स तोडून येणाऱ्या शेतकऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि वॉटर कॅनॉनचा वापर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या या विरोधाचे, आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु या आंदोलकांपैकी एका तरुणाचा या आंदोलनातील सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे.

वॉटर कॅनॉन बंद करण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर चढला तरूण -

सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ कुरूक्षेत्रजवळचा आहे. येथे हा तरूण आंदोलनकर्ता पोलिसांच्या गाडीवर चढला आणि शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करणारा वॉटर कॅनॉन बंद केला. एवढंच नाही, तर पोलीस त्याला गाडीवर पकडण्यासाठी गेले, त्यावेळी तो एका गाडीवरून उडी मारून आपल्या ट्रॉलीवर पोहचला.

(वाचा - पत्नीने फसवणुकीची दिली भयानक शिक्षा; पतीला पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकलं)

या आंदोलनकर्त्याचं नाव नवदीप सिंह असून तो अंबाला जिल्ह्यातील आहे. ग्रॅज्युएट असणारा नवदीप 250 हून अधिक गावातील ग्रामस्थांसह आंदोलनात सामिल झाला होता. 'द क्विंट'ने दिलेल्या माहितीनुसार, नवदीपने एका पंजाबी चॅलनशी बोलताना सांगितलं की, 'मी अभ्यास करणारा, शिकणारा, शिक्षित मुलगा आहे. मी कधीही अशाप्रकारची कामं केली नाही. परंतु आंदोलनकर्त्यांच्या शौर्याने मला प्रोत्साहित केलं, आणि मी पोलिसांकडून होणारा पाण्याचा मारा बंद करण्यासाठी त्या गाडीवर चढलो.'

(वाचा - कोरोना लशीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; म्हणाले...)

'मी ट्रॅक्टर ट्रॉलीवरून, वॉटर कॅनॉन ट्रकवर चढलो आणि तेथील नळ बंद केला. एक पोलीस मला पकडण्यासाठी वर आला. त्यावेळी माझा भाऊ ट्रॅक्टर घेऊन जवळ आणि मी त्यावर उडी मारली. पोलिसांनी मला दांड्यांनी मारलंही. परंतु पोलिसांविरोधात कोणतीही नाराजी नसल्याचं', त्याने सांगितलं.

हरियाणातील शेतकऱ्यांनी, करनाल-मेरठ, रोहतक झज्जर आणि दिल्ली-हिसार मार्गांसह अनेक मार्गांवर ब्लॉक केला होता.

शेकडोंच्या संख्येत शेतकऱ्यांनी, दिल्लीच्या उत्तर प्रदेश सीमेवर एकत्र येत आंदोलनं केली. हे सर्व शेतकरी राजधानीत एन्ट्री करण्याचा प्रयत्न करत होते.

Published by: Karishma Bhurke
First published: November 27, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading