कोरोना लशीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; म्हणाले...

कोरोना लशीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; म्हणाले...

वॅक्सिन कशाप्रकारे देण्यात येईल, याचीही योजना असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. सुरुवातीला फ्रंटलाईन कर्मचारी, मेडिकल कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना वॅक्सिन देण्यात येईल.

  • Share this:

वॉशिंग्टन, 27 नोव्हेंबर : अमेरिकेतील निवडणूक निकालांनंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सार्वजनिकपणे अतिशय कमी दिसून येतात. गुरुवारी ट्रम्प व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परदेशात उपस्थित असलेल्या अमेरिकन लोकांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना वॅक्सिनबाबत मोठी घोषणा केली. कोरोना व्हायरसवरील (Corona Virus) वॅक्सिनची डिलिव्हरी पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यापूर्वी काही अधिकाऱ्यांनीही, देशात Pfizer-BioNtech वॅक्सिनला इमरजेंसी उपयोगासाठी परवानगी मिळाल्यास, त्याच्या एका आठवड्यानंतर याचे 64 लाख डोस वाटण्याची योजना तयार होत असल्याचं सांगितलं होतं.

गुरुवारी थँक्सगिविंग हॉलिडेला परदेशात असलेल्या अमेरिकन लोकांशी ट्रम्प यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, पुढच्या आठवड्यात आणि त्याच्या एका आठवड्यानंतर वॅक्सिनची डिलिव्हरी सुरू होईल. वॅक्सिन कशाप्रकारे देण्यात येईल, याचीही योजना असल्याचं ते म्हणाले. सुरुवातीला फ्रंटलाईन कर्मचारी, मेडिकल कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना वॅक्सिन देण्यात येईल.

एस्ट्राजेनेका (Astrazeneca) आणि ऑक्सफोर्डने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कमी डोस आणि त्यानंतर डोस 90 टक्के प्रभावी ठरला, तर दोन डोस 62 टक्के प्रभावी ठरले. सुरक्षेबाबत कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर, एस्ट्राजेनेकाच्या सीईओने, कंपनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर ट्रायल करेल, अशी घोषणा केली.

पंतप्रधान मोदींचा सीरम इन्स्टिट्यूट दौरा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा दौरा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान वॅक्सिनची निर्मिती आणि याच्या वितरणाची प्रक्रिया समजून घेतील. पुण्याचे डिव्हिजनल कमिश्नर सौरभ राव यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 100 देशांचे राजदूत आणि हाय कमिश्नर पुण्यात येण्याचा कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी होणार आहे. हे सर्व राजदूत आणि हाय कमिश्नर सीरम इन्स्टिट्यूट आणि जेनोवा बायोफार्मास्यूटिकल्सचा दौरा करणार आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: November 27, 2020, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading