मराठी बातम्या /बातम्या /देश /Farmer's Protest updates: ट्रॅक्टर रॅलीदरम्यान नेमकं काय घडलं?

Farmer's Protest updates: ट्रॅक्टर रॅलीदरम्यान नेमकं काय घडलं?

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान नेमकं काय घडलं?

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान नेमकं काय घडलं?

आज आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. आज सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. एक नजर टाकूयात या ट्रॅक्टर रॅलीमधील दिवसभराच्या घडामोडींवर.

  नवी दिल्ली 26 जानेवारी : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आंदोलक शेतकऱ्यांनी  ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. आज सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. एक नजर टाकूयात या ट्रॅक्टर रॅलीमधील दिवसभराच्या घडामोडींवर.

  दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीची सुरूवात केली. दिल्ली पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना दुपारच्या 12 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर या वेळेआधीच दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करु लागले. इथूनच पोलीस आणि आंदोलकांच्यातील तणावाला सुरुवात झाली.

  संबंधित - ट्रॅक्टर मोर्चातल्या हिंसेबद्दल 40 शेतकरी संघटनांचा खळबळजनक दावा

  शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, आंदोलकांनी बॅरिकेड तोडल्यानंतर पोलिसांनी आश्रूधुराचा वापर करण्यास सुरूवात केली. दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पोलिसांचा लाठीचा वापर करावा लागला. तर, काही ठिकाणी आंदोलकांनीच पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनाही समोर आल्या.

  लाल किल्ल्याकडे कूच

  जेव्हा आंदोलक शेतकऱ्यांनी सीमा पार करुन आतमध्ये प्रवेश केला, तेव्हा शेतकऱ्यांकडून लाल किल्ल्याकडे पोहोचण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. लाल किल्ल्याजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना अडकवण्यासाठी बैरिकेट लावले होते.

  संबंधित -  आंदोलकानं ध्वजस्तंभावर चढताना काय केलं पाहा; धक्कादायक VIDEO पाहून काय म्हणाल?

  मात्र, दिल्लीच्या सीमेपासून लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या शेतकऱ्यांसमोर हे बॅरिकेडही टिकले नाहीत. आंदोलनकर्त्यांनी बैरिकेट तोडून लाल किल्ल्याकडे कूच केली.

  संबंधित - 'दिल्लीतील घटनेचं समर्थन करता येणार नाही, पण...', शरद पवारांची रोखठोक भूमिका

  इतके प्रयत्न करुनही दिल्ली पोलीस शेतकऱ्यांना लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टर घेऊन येण्यापासून थांबवू शकले नाहीत. अनेक आंदोलक ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले. प्रजासत्ताक दिनी झालेल्या या ट्रॅक्टर रॅलीला आक्रमक रूप आल्याचे पाहायला मिळाले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली एनसीआर भागातील सिंघू, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक आणि नांगलोई भागात  इंटरनेट सेवा सध्या तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

  संबंधि - सरकार या दिवसाची वाट पाहत होतं का? दिल्लीतील राड्यावरून शिवसेनेचा गंभीर आरोप

  परतीच्या मार्गावर Alert

  दिल्लीतील या आक्रमक आंदोलनाबाबत गृह मंत्रालयात सतत बैठका होत आहेत. आजच्या हिंसाचाराशी संबंधित प्रत्येक घटनेचा आढावा घेतला जात असून आतापर्यंत 3 महत्त्वाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी बनवलेली एक विशेष टीम परिस्थितीविषयी दिल्ली एनसीआरच्या अधिकाऱ्यांकडून सतत माहिती घेत आहे. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर्स परतीच्या मार्गावर आहेत.

  First published:

  Tags: Delhi, Farmer protest, Republic Day