मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! आंदोलकानं ध्वजस्तंभावर चढताना काय केलं पाहा; हा VIDEO पाहून काय म्हणाल?

धक्कादायक! आंदोलकानं ध्वजस्तंभावर चढताना काय केलं पाहा; हा VIDEO पाहून काय म्हणाल?

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेतकरी आंदोलनादरम्यानचा (Farmers protest ralley) एक VIDEO शेअर केला आहे. 26 जानेवारी (Republic Day)च्या दिवशीच झालेला हा अवमान पाहून काय वाटतं?

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेतकरी आंदोलनादरम्यानचा (Farmers protest ralley) एक VIDEO शेअर केला आहे. 26 जानेवारी (Republic Day)च्या दिवशीच झालेला हा अवमान पाहून काय वाटतं?

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेतकरी आंदोलनादरम्यानचा (Farmers protest ralley) एक VIDEO शेअर केला आहे. 26 जानेवारी (Republic Day)च्या दिवशीच झालेला हा अवमान पाहून काय वाटतं?

  नवी दिल्ली, 26 जानेवारी: शेतकरी आंदोलकांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (Republic Day)ट्रॅक्टर रॅलीची परवानगी मिळाली आणि दिल्लीत शिरलेल्या आंदोलकांनी एकच गलका केला. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. लाल किल्ल्यावर काही आंदोलक पोहोचले. काहींनी लाल किल्ल्यावर आंदोलनाचा झेंडा फडकावला. या दरम्यानचा एक VIDEO भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी Twitter वरून शेअर केला आहे. आंदोलनातला सर्वात धक्कादायक VIDEO असं त्याचं वर्णन करता येईल.

  VIDEO मध्ये एक जण ध्वजस्तंभावर चढताना दिसतो आहे. त्याला तिथे आंदोलनाचा ध्वज फडकावायचा आहे. इतर आंदोलकांच्या गराड्यातून तो वर चढतो. अनेकांच्या हातात विविध झेंडे आहेत. तो वर चढत असताना झेंड्यासाठी हात करतो. एकाच्या हातातला तिरंगा त्याच्या हाती लागल्यावर तो फेकून देतो आणि दुसरा झेंडा हाती घेऊन वर चढतो.

  प्रजासत्ताक दिनालाच राष्ट्रध्वजाचा असा अवमान झालेला पाहणं अत्यंक क्लेशकारक आहे. संबित पात्रा यांनीदेखील या व्हीडिओला दुःखद एवढीच ओळ लिहिली आहे.

  भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा ह्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत ' दुःखद! ' अश्या शब्दांतआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  दुःखद!! pic.twitter.com/gk944uW1ZW

  — Sambit Patra (@sambitswaraj) January 26, 2021

  PTC न्यूज नावाच्या चॅनेलवर दाखवलेली ही व्हिडीओ क्लिप असल्याचं दिसतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर होत असुन लोकांच्या यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

  नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने (supreme court) मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

  First published:
  top videos

   Tags: BJP, Delhi, Farmer protest, Republic Day, Social media