मराठी बातम्या /बातम्या /देश /Kisan Tractor Rally : ट्रॅक्टर मोर्चातल्या हिंसेबद्दल 40 शेतकरी संघटनांचा खळबळजनक दावा

Kisan Tractor Rally : ट्रॅक्टर मोर्चातल्या हिंसेबद्दल 40 शेतकरी संघटनांचा खळबळजनक दावा

कृषी कायदे (Farm Laws) रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती, आणि या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

कृषी कायदे (Farm Laws) रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती, आणि या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

कृषी कायदे (Farm Laws) रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती, आणि या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

नवी दिल्ली, 26 जानेवारी : कृषी कायदे (Farm Laws) रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती, आणि या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.  (farmers protest) मात्र यामागे घुसखोर असल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. दरम्यान आज दिल्लीतील अनेक भागांमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. यानंतर संयुक्त किसान मोर्चाने आपली भूमिका जाहीर केली आहे. (Kisan Tractor Rally)

किसान मोर्चाने या प्रकरणात सांगितलं की, आज आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांना आम्ही विरोध करीत आहोत. या घटनेमागे जे लोक जबाबदार आहेत, त्यांचा किसान मोर्चाशी काहीही संबंध नाही. याशिवाय या आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकऱ्यांच्या संघटनांनी या हिंसेचा निषेध केला आहे. ही आंदोलनात झालेली घुसखोरी आहे. आम्ही नेहमीच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन न करता आंदोलनाला नुकसान पोहोचू द्यायचा नाही, हाच आमचा हेतू असल्याचा किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं.

हे ही वाचा-Farmers Protest : शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडले, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

गेल्या 6 महिन्यांपासून शेतकरी संघर्ष करीत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलनातही शांततेच्या मार्गाने व्हावं, हीच आमची इच्छा आहे. आंदोलनादरम्यान नियमभंग वा हिंसक घटना घडल्या त्याच्यासोबत शेतकरी संघटनांना काहीही संबंध नाही. अंस करण्यापासून मोर्चातील शेतकऱ्यांनी दूर राहावे, असंही त्यांनी सांगितलं. आज नेमकं काय घडलं यासंदर्भात माहिती घेतली जात असून यासंदर्भात लवकरच चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा मोर्चाच्या प्रमुखांकडून व्यक्त केली जात आहे.

महिला पोलिसावर हल्ला

कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (farmers protest) हिंसक वळण प्राप्त झालं आहे. आज होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Kisan Tractor Rally)पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झटापटही झाली आहे. दरम्यान, यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी एका महिला पोलीस कर्मचारीवर ( delhi police) लाठी हल्ला केला आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

First published:

Tags: Delhi, Farmer protest, Republic Day, Republic day india