हिमांशू, प्रतिनिधी सीतापूर, 14 जुलै : आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भातशेती केली जाते, विविध भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही विविध प्रकारची शेती केली जाते. तेथील बहुतेक शेतकरी विविध धान्य, कडधान्य आणि ऊसाचं उत्पादन घेतात. अशातच येथील एका शेतकऱ्याने थेट अळूचं उत्पादन घेऊन हजारोंचा नफा मिळवला आहे. सीतापूरपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या लखीमपूर रोडवरील धरनाग गावातील रहिवासी अभिषेक सिंह यांनी आपल्या शेतात आंबे आणि अळूची लागवड केली. यासह ते हंगामानुसार विविध भाज्यांचं उत्पादनही घेतात. भाज्यांच्या लागवडीतून हजारोंचा नफा मिळू शकतो, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. शिवाय आजकाल तरुणमंडळी शेतीकडे पाठ फिरवत असताना, त्यांनी यशस्वी शेतकरी होऊन सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
अभिषेक यांना शेतीसाठी जवळपास 20 ते 25 हजारांचा खर्च येतो. तर, 50 ते 60 हजारांचा नफा मिळतो. हंगामानुसार पीक घेणं हीच त्यांची खासियत आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येक भाजीचा एक कालावधी असतो, त्यात तिचं चांगलं पीक घेता येतं. हीच बाब लक्षात घेऊन मी शेती करतो.’ दरम्यान, अभिषेक यांच्या शेती उत्पादनात अळूच्या कंदांचा प्रामुख्याने खप होतो. त्यांचा नफ्यात मोठा वाटा असतो. शाहरुखच्या कासवांचे शाही नखरे; त्यांच्यासाठी आहे खास झोपाळा, प्रत्येक ‘मन्नत’ होते पूर्ण अभिषेक हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून विविध भाज्यांची लागवड करतात. पूर्वी त्यांचे थोरले बंधू हंगामानुसार भाज्यांची लागवड करायचे. आता त्यांचा कार्यभार अभिषेक सांभाळतात. प्रामुख्याने ते अळूचं उत्पादन घेतात. तसेच भाज्या सीतापूर, लखीमपूर बाजारपेठेत पाठवतात. शिवाय आजूबाजूच्या गावातील नागरिकांकडूनही त्यांच्या भाज्यांना मोठी मागणी असते.