CDS बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय Viral, लष्कराचा सतर्कतेचा इशारा

CDS बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय Viral, लष्कराचा सतर्कतेचा इशारा

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,2 जानेवारी: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नौदल आणि वायुदलाच्या तुलनेत भूदलाने शानदार कामगिरी केल्याचा दावा, या बनावट पत्रातून करण्यात आला आहे. 'भारताच्या पहिल्या चीफ डिफेन्स ऑफ स्टाफपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. वायुदला (एअरफोर्स) आणि नौदल (नेव्ही), भूदलाच्या धर्तीवर काम करती, असा माझा प्रयत्न राहील.' असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

भारतीय लष्कराचे जनसंपर्क शाखा ADGPIने हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. ADGPI ने एका ट्वीटमध्ये म्हटल की, 'काही लोक सोशल मीडियावर बनावट पत्र व्हायरल करून चूकीची माहिती पसरवत आहे, सतर्क रहा.'

दुसरीकडे, भारत सरकारच्या सूचना व प्रसारण कार्यालयाने (PIB) एक फॅक्ट चेकमध्ये सांगितले आहे की, 'जनरल बिपिन रावत यांच्या नावे एक कथित पत्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. असे कोणतेही पत्र जनरल बिपिन रावत यांनी लिहिलेले नाही. हे पत्र बनावट आहे.

First published: January 2, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading