मुंबई, 17 सप्टेंबर: मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटील (Former Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न (Attempt Suicide) केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री मनोज पाटीलनं आत्महत्येचा प्रयत्न (Attempt to suicide) केला. धक्कादायक म्हणजे हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मनोज पाटील याने एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत हा गुन्हा दाखल केला आहे. मनोज पाटीलला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खान आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
#Maharashtra | Case has been registered against actor Sahil Khan and three others for allegedly instigating actor Manoj Patil to attempt suicide: Mumbai Police
— ANI (@ANI) September 17, 2021
Patil is currently undergoing treatment at a hospital in Mumbai
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पाटीलवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अभिनेता साहिल खान आणि इतर तिघांविरोधात अभिनेता मनोज पाटील यांना आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री विषारी गोळ्या घेत मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोज याला त्याच्या उपचारासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मनोजची प्रकृती स्थिर आहे. हेही वाचा- पाळीव पोपट मालकीणीला मिळवून देणार न्याय; बलात्कार अन् हत्याप्रकरणी कोर्टात देणार साक्ष अभिनेता साहिल खानवर आरोप मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज पाटील याने आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली. यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला विनाकारण त्रास देतो आणि सोशल मीडियात बदनामी करतो त्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं मनोजनं म्हटलं होतं. दाऊदनं जान मोहम्मदला दिली होती या बड्या गँगस्टरची सुपारी, फेल गेला प्लॅन मनोज पाटील याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांत भाग घेतला आहे. या प्रकरणी मनोज पाटील याचे कुटुंबीय मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.