• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुलगा-सुनेच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका; 10 दिवसात आलिशान घर सोडण्याचे आदेश

मुलगा-सुनेच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका; 10 दिवसात आलिशान घर सोडण्याचे आदेश

Crime in Mumbai: वयोवृद्ध आईवडिलांची छळवणूक करणाऱ्या मुलाला दहा दिवसांच्या आत आई वडिलांचं आलिशान घर सोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर: एका सुशिक्षित मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलांची छळवणूक (elderly couple harassment) केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. संबंधित आरोपी मुलाला दहा दिवसांच्या आत आई वडिलांचं आलिशान घर सोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे पुढील दहा दिवसांच्या आत संबंधित मुलाला आपल्या पत्नीसह मुंबईतील जुहू परिसरातील आलिशान घर सोडावं लागणार आहे. न्यायालयानं मुलगा आणि सुनेच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका केली आहे. आशिष दलाल असं संबंधित मुलाचं नाव असून तो मुंबईतील जुहू परिसरातील एका आलिशान इमारतीत आपली पत्नी आणि आई वडिलांसोबत राहातो. संबंधित मुलाने आणि सुनेनं नव्वदीत पोहोचलेल्या या वृद्ध दाम्पत्याचा छळवणूक सुरू केली होती. याप्रकरणी वृद्ध दाम्पत्यानं देखभाल लवादाकडे धाव घेत, आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती दिली होती. त्यानंतर संबंधित लवादाने मुलाला आणि सुनेला आई वडिलांचं घर सोडण्याचा आदेश दिला होता. आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्याअंतर्गत लवादानं हा आदेश दिला होता. हेही वाचा-मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लवादानं हा निर्णय दिल्यानंतर मुलगा आशिष दलालने या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते. पण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी लवादाचा निर्णय योग्य ठरत याचिकाकर्त्याला आईवडिलांचं घर सोडण्याचा आदेश दिला आहे. दहा दिवसांच्या आत घर सोडावं असंही कोर्टानं म्हटलं आहे. हेही वाचा-मुंबईत विकृताकडून तरुणीचा छळ; फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर बदनामी न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं की, 'आपल्यासमोर हताश आईवडिलांची दु:खद कहाणी आहे. त्यांना आयुष्याचा हा काळ शांततेत आणि आनंदात जगायचा आहे. त्यांच्या कमीत कमी गरजा आहेत. पण श्रीमंत मुलामुळे त्यांना त्यांच्या अपेक्षा आणि गरजांपासून वंचित राहावं लागत आहे. वृद्ध आणि गरजू पालकांची काळजी घेण्याऐवजी त्यांचा छळ केला जात आहे. याचिकाकर्ता आपल्या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या वयात मुलानं आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडलं आहे.'
  Published by:News18 Desk
  First published: