जाहिरात
मराठी बातम्या / देश / Exit Polls 2022: भाजप उत्तर प्रदेशचा गड राखणार पण... हे आहेत सर्वात धक्कादायक निकाल

Exit Polls 2022: भाजप उत्तर प्रदेशचा गड राखणार पण... हे आहेत सर्वात धक्कादायक निकाल

Exit Polls 2022: भाजप उत्तर प्रदेशचा गड राखणार पण... हे आहेत सर्वात धक्कादायक निकाल

मोदी- योगी उत्तर प्रदेशचा गड राखण्यात यशस्वी होणार. सलग दुसरा ऐतिहासिक विजय भाजपला मिळू शकतो. पण या राज्यात सर्वांत धक्कादायक निकाल कुठला असेल? poll of polls काय सांगतं बघा..

  • -MIN READ
  • Last Updated :

    दिल्ली, 7 मार्च: उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. अंतिम टप्प्यातलं मतदान उत्तर प्रदेशात नुकतंच पार पडलं आहे. आता या राज्यांच्या मतदारांनी कोणाला कौल दिला आहे  याचा अंदाज काही Exit Polls मधून समोर आला आहे. पहिल्या EXIT POLL चा निकाल बाहेर येत आहे. रिपब्लिक टीव्हीने P MARQ ने दाखवलेल्या मतदानोत्तर चाचणीत - UP Exit Polls 2022 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीसारखं निर्विवाद घवघवीत यश मात्र योगी सरकार टिकवू शकणार नाही असं चित्र आहे. अमित शहा आणि योगींनी केलेल्या दाव्यानुसार 300 चा आकडा पार करताना भाजप दिसणार नाही, असं सर्वच exit polls मध्ये दिसतं. घवघवीत नसलं तर निर्विवाद यश भाजपच्या पारड्यात पडणार असं हे अंदाज सांगतात. मार्टिझ पोलने दाखवलेल्या अंदाजानुसार भाजपला 277 पर्यंत जागा मिळू शकतात. समाजवादी पक्षाची मुसंडी 134 पर्यंत पोहोचू शकते. पण 202 जागांचा टप्पा पार करणं भाजपला सहस शक्य आहे, असं या exit poll मधूनही दिसलं.

    पोलस्ट्रॅटने (Poll of Polls) केलेल्या सर्व्हेत भाजपला कमीत कमी 211 ते 225 जागा मिळतील असा  अंदाज वर्तवला आहे. या कमीत कमी अंदाजानुसारही भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता टिकवून ठेवता येणार आहे हे स्पष्ट आहे. मायावतींच्या बसप आणि काँग्रेसची अवस्था या निवडणुकीनंतर अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पहिल्याच एक्झिट पोलमध्ये भाजपला धक्का, ABP C-Voter पोलमध्ये काँग्रेसची मुसंडी पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात भाजपची सत्ता येणं तितकंसं सोपं नाही, हेही या एक्झिट पोल्सनी दाखवून दिलं. भाजपला गेल्या निवडणुकीत प्रथमच उत्तर प्रदेशात खणखणीत यश मिळालं.  योगी आदित्यनाथ सरकार गेल्या वेळच्या 312 पैकी किती जागा मिळवणार याचे अंदाज वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत.

    उत्तर प्रदेशात 403 जागांच्या विधानसभेसाठी मतदारांनी कौल दिला आहे. याचा निकाल गुरुवारी (Assembly Election Result 2022 date)10 मार्चला लागेल. 202 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत.  403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिलं होतं. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपने जाहीर केलेला नव्हता, तेव्हाचं हे घवघवीत यश आता पुन्हा मिळणार का हा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ सरकारला ते मागचं यश टिकवण्याचं मोठं आव्हान आहे.

    जाहिरात

    एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल.

    योगी आदित्यनाथ भाजपला किमान बहुमताचा आकडा गाठून देऊ शकतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात