• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Ex Boyfriend ने दिली Sex चॅट व्हायरल करण्याची धमकी, 23 वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Ex Boyfriend ने दिली Sex चॅट व्हायरल करण्याची धमकी, 23 वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Ex Boyfriend ने दिली Sex चॅट व्हायरल करण्याची धमकी, 23 वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल (प्रातिनिधिक फोटो)

Ex Boyfriend ने दिली Sex चॅट व्हायरल करण्याची धमकी, 23 वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल (प्रातिनिधिक फोटो)

Ex boyfriend threatens to make sex chat viral: एक्स बॉयफ्रेंड चॅट व्हयारल करण्याची वारंवार तरुणीला धमकी देत होता.

 • Share this:
  गांधीनगर, 31 ऑक्टोबर : गुजरातमधील गांधीनगर येथील एका 23 वर्षीय तरुणीने कथितपणे गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (23 year old girl suicide) केला आहे. रिपोर्ट्सनुसार, तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार आपले सेक्स चॅट व्हायरल करण्याची धमकी देत होता (ex boyfriend threatens to make sex chat viral) आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर मानसा पोलिसांनी महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय या मुलीने गुजरातमधील गांधीनगर येथील एका कॉलेजमधून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सोमवारी ती आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ज्यावेळी तिने हे पाऊल उचललं त्यावेळी घरात ती एकटीच होती. तर तिचे वडील चुलत बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. या घटनेप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देताच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. कुटुंबाची बदनामी होईल असे वाटत असल्याने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी तरुणीचे वडील तिची डायरी, मोबाइल फोन आणि बॅग तपासत होते त्यावेळी डायरीत जे काही लिहिलं होतं ते वाचून त्यांना धक्काच बसला. वाचा : आधी पार्टी केली मग मित्रावर 40 मिनिटांत केले 107 वार, प्रायव्हेट पार्ट कापून डोळाही काढला डायरीत तरुणीने लिहिले होते की, गांधीनगर येथील नारदीपूर गावात राहणारा रुशी आपल्या मित्रांसोबत मिळून सेक्स चॅट व्हायरल करण्याची धमकी देत होता. तिने रुशी सोबतचे नाते तोडले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, आरोपी रुशी हा पुन्हा तरुणीसोबत नाते ठेवण्यास उत्सुक होता मात्र, त्या तरुणीने त्याला नकार दिला होता. लोकमत न्यूज डॉट इनने या संदर्भात वृत्त दिलं आहे. तिने आपल्या डायरीत पुढे हिलिले होते की, आमच्यात झालेले चॅट व्हायरल करण्याची रुशी वारंवार धमकी देत होता आणि या सर्वांना वैतागून मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला तोच जबाबदार आहे. त्याच्यामुळेच मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. अमेरिकेत एक्स गर्लफ्रेंडसोबत शारिरिक संबंध ठेवले, प्रियकराने केली वर्गमित्राची हत्या अल्पवयीन मुलांमध्येही गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. अमेरिकेत तर हे प्रमाण भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका 17 वर्षांच्या मुलाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत सोबत सेक्स केल्यामुळे वर्गमित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीसह त्याची आताची प्रेयसी आणि आणखी एका मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्वेट ग्रँट असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तो 18 वर्षांचा होता. आरोपीला जेव्हा हे समजलं, की ग्रँटने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत सेक्स केलं आहे, तेव्हाच त्याने ग्रँटला मारण्याची योजना बनवली. यानुसार, आरोपीच्या आताच्या गर्लफ्रेंडने ग्रँटला सेक्सचे आमिष दाखवून त्याच्या अपार्टमेंटच्या आतल्या बाजूला नेले. आपत्कालीन पायऱ्यांच्या ठिकाणी एकांत मिळेल, असं सांगून तिने ग्रँटला त्या ठिकाणी नेलं. हे दोघे पायऱ्यांकडे जात असतानाच आरोपीने मागून येत चाकू आणि तलवारीच्या साहाय्याने ग्रँटवर हल्ला केला. यात त्याच्या मानेवर आणि छातीवर वार करण्यात आले.
  Published by:Sunil Desale
  First published: