Home /News /national /

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत EVM-VVPAT पूर्णपणे निष्पक्ष; निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत EVM-VVPAT पूर्णपणे निष्पक्ष; निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब

नुकत्याच पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसामव्यतिरिक्त केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरी येथे निवडणुका पार पडल्या.

    नवी दिल्ली, 3 जून : विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) आणि वोटर वेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल्सचं (VVPAT) एकत्रिकरण 100 टक्के झालं असून या मशिन्स निष्पक्षपणे काम करीत असल्याचं सिद्ध झालं आहे. यावर देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की, डेटामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची जुळणी 100 टक्के राहिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन या सर्व मशीन पूर्णपणे निष्पक्षपणे काम करीत असल्याचं सिद्ध झालं आहे. नुकत्याच पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसामव्यतिरिक्त केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरी येथे निवडणुका पार पडल्या. ईव्हीएमला 1989 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारा विकसित करण्यात आलं होतं. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात व्हीव्हीपॅट यूनिटचा वापर सुरू झाला. 2014 मध्येही 8 संसदीय जागांवर व्हिव्हीपॅटचा वापर झाला होता. हे ही वाचा-कसं, कुणी आणि कधी घ्यावं 2DG? कोरोना औषधाबाबत जरूर वाचा DRDO च्या सूचना विधानसभा निवडणुकीत 1492 व्हिव्हीपॅट पश्चिम बंगालमध्ये, 1183 तामिळनाडूत, 728 केरळमध्ये, 647 आसाम आणि 156 पाँडिचेरीमध्ये लावण्यात आली होती. एप्रिल 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितलं होतं की, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, प्रत्येक निवडणूक क्षेत्रातून पाच ईव्हीएमच्या व्हिव्हीपॅट स्लिपची जुळणी केली जावी. 21 विरोध पक्षांनी 2019 मध्ये यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला होता. हे ही वाचा- इस्रायल-पॅलेस्टाइन वाद : जेव्हा गांधीजी म्हणाले होते की, जर मी ज्यू असतो तर... यानुसार व्हिव्हीपॅट स्लिपची पुन्हा तपासणी करणं आवश्यक आहे. याशिवाय दुसरीकडे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला व्हिव्हीपॅटच्या जुळणीसाठी पत्र लिहिलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam Election, Election 2021, Election commission, Mamata banerjee, West bangal

    पुढील बातम्या