मराठी बातम्या /बातम्या /explainer /इस्रायल-पॅलेस्टाइन वाद : जेव्हा महात्मा गांधीजी म्हणाले होते की, जर मी ज्यू असतो तर...

इस्रायल-पॅलेस्टाइन वाद : जेव्हा महात्मा गांधीजी म्हणाले होते की, जर मी ज्यू असतो तर...

'मी ज्यू असतो आणि जर्मनीत जन्मलो असतो, तसंच जर्मनीतच उपजीविका करत असतो, तर मी असा दावा केला असता, की....

'मी ज्यू असतो आणि जर्मनीत जन्मलो असतो, तसंच जर्मनीतच उपजीविका करत असतो, तर मी असा दावा केला असता, की....

'मी ज्यू असतो आणि जर्मनीत जन्मलो असतो, तसंच जर्मनीतच उपजीविका करत असतो, तर मी असा दावा केला असता, की....

  नवी दिल्ली, 28 मे: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू झालेलं युद्ध अखेर 11 दिवसांनी थांबलं. अनेकांना त्यात प्राण गमवावे लागेल आणि अनेक जण जखमी झाले. इस्रायल-पॅलेस्टाइन वाद फार जुना असून, त्या वादाच्या सुरुवातीपासूनच महात्मा गांधीजींची (Mahatma Gandhiji) यावर नजर होती. युरोपात ज्यू धर्मीयांच्या झालेल्या दशेमुळे ते व्यथित झाले होते. मात्र त्यांनी या वादाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रमाणेच परिस्थिती आत्ता दिसत आहे. 'बीबीसी हिंदी'वेबसाईटवर याबद्दलचा लेख प्रसिद्ध झाला आहे. गांधी शांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार प्रशांत यांनी तो लिहिला आहे.

  1938 मध्ये सीमा भागात दौरा करून ते परत आले, तेव्हा त्यांनी 'इसाइयत के अछूत' नावाचं संपादकीय लिहिलं होतं. 'ज्यू-धर्मीयांना माझी सहानुभूती आहे. मी दक्षिण आफ्रिकेत होतो, तेव्हापासून त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्यापैकी काही जणांशी माझी घट्ट मैत्रीही आहे. त्यांच्या माध्यमातूनच मी त्यांच्याबद्दल जाणून घेतलं आहे. हिंदूंनी अस्पृश्यांशी जसं वर्तन केलं, तसंच वर्तन ख्रिश्चनांनी (Christian) ज्यूंसोबत केलं आहे. माझ्या मित्रांव्यतिरिक्त अन्य ज्यू धर्मीयांप्रतिही मला सहानुभूती वाटते. तरीही न्यायदृष्टीने पाहणं मी थांबवू शकत नाही. 'आमचं राष्ट्रीय घर' ही ज्यूंची मागणी मला पटत नाही. यासाठी बायबलमध्ये आधार शोधला जात आहे. त्या आधारे पॅलेस्टिनी प्रदेशात जाण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो; पण जसं जगभरातले लोक करतात, तसं ज्यू धर्मीय का करत नाहीत? ते जिथे जन्मले आहेत आणि जिथे आपली रोजी-रोटी कमावतात, त्या ठिकाणालाच आपलं घर का मानत नाहीत?,' असं गांधीजींनी आपल्या संपादकीय मध्ये लिहिलं होतं.

  'इंग्लंड इंग्लिश लोकांचं आहे, फ्रान्स फ्रान्सच्या नागरिकांचं आहे, तसंच पॅलेस्टाइन (Palestine) अरबांचं आहे. त्यामुळे ज्यूंना जबरदस्तीने पॅलेस्टाइनमध्ये पाठवणं हे अनुचित आणि अमानवीय होईल.. ज्यू धर्मीय जिथे जन्मले, वाढले आणि स्थिरावले तिथे त्यांना चांगली वागणूक मिळायला हवी. ज्यूंना जर केवळ पॅलेस्टाइनच हवं असेल, तर जगभरातल्या ज्या ज्या ठिकाणी आज त्यांचं वास्तव्य आहे, तिथून त्यांना जबरदस्तीने हाकलून दिलं तर त्यांना चांगलं वाटेल का? 'स्वतःसाठी एक राष्ट्रीय घर' या त्यांच्या नाऱ्यामुळे जर्मनीतून त्यांना हाकलण्यात आलं त्यामागेही हे कारण दिलं जाऊ शकतं,' अशी भूमिका गांधीजींनी मांडली होती.

  हे ही वाचा-Explainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या

  'जर्मनीत ज्यूंसोबत जे काही झालं, ते इतिहासातलं सर्वांत भीषण आहे. हिटलरने जे काही केलं, तसं कोणीच केलं नव्हतं. नग्न हिंसा किती क्रूर आणि भीतिदायक असू शकते, हे जर्मनीने दाखवलं आहे. या संघटित दमनाचा प्रतिकार ज्यू करू शकले असते का?' असं गांधीजींनी लिहिलं आहे.

  'मी ज्यू असतो आणि जर्मनीत जन्मलो असतो, तसंच जर्मनीतच उपजीविका करत असतो, तर मी असा दावा केला असता, की एखाद्या शक्तिशाली जर्मन व्यक्तीचं जर्मनी हे घर आहे, तसंच ते माझंही आहे. मी त्याला आव्हान दिलं असतं, की तू मला गोळी घाल किंवा तुरुंगात डांब, मी इथून कुठेही जायला किंवा भेदभावाची वागणूक स्वीकारायला तयार नाही. बाकीचे ज्यू-धर्मीयही माझ्याबरोबर येण्याची वाट मी पाहिली नसती. मी विश्वासाने पुढे गेलो असतो आणि बाकीचे आपोआप माझ्याबरोबर आले असते. अशा प्रकारे एखादा जरी ज्यू धर्मीय वागला असता, तरी ज्यू धर्मीयांची (Jew) स्थिती आज जितकी दयनीय आहे, तितकी असली नसती,' असं गांधीजींनी लिहिलं होतं.

  'दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना जशी वागणूक मिळत होती, तशीच वागणूक जर्मनीत ज्यूंना मिळत आहे; मात्र ज्यू संघटित आहेत आणि त्या भारतीयांपेक्षा अधिक कुशल आहेत. ज्यूंची परिस्थिती त्या भारतीयांच्या तुलनेत खूप चांगली आहे. कोणी साहसाने उभं राहिलं, तर ते जागतिक जनमत उभं करू शकतात. बायबलमध्ये ज्या पॅलेस्टाइनचा उल्लेख आहे, तो आज भौगोलिक स्वरूपात नाही. अरबांच्या मनातही तोच ईश्वर आहे, जो ज्यूंच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी अरबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे,' असं त्यांनी लिहिलं होतं.

  या लेखावरून जर्मनीत (Germany) गांधीजींविरोधात प्रचंड क्षोभ निर्माण झाला. 'त्यांचा क्रोध शांत झाल्यावर त्यांना कळेल, की मी मित्रभावनेनंच लिहिलं होतं,' अशी प्रतिक्रिया त्यावर गांधीजींनी व्यक्त केली होती.

  पाच मे 1947 रोजी रॉयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेचे पत्रकार डून कँपबेल (Doon Campbell) यांच्याशी बोलताना गांधीजी म्हणाले होते, की पॅलेस्टाइनची समस्या आता अशा स्थितीला आली आहे, की ज्यावर काहीही उपाय निघू शकत नाही.

  हिंसेचा मार्ग सोडून दिला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं.

  14 मे 1948 रोजी इस्रायलची निर्मिती झाली. त्यापूर्वीच गांधीजींची हत्या झाली होती; मात्र त्यांनी या समस्येबद्दल केलेल्या वक्तव्याला आता 75 वर्षं झाली आहेत. या समस्येला काही उत्तर नसल्याचंच पुन्हा पुन्हा होणाऱ्या वादांवरून दिसतं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Israel, Mahatma gandhi, Palestinian