नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : रामचरितमानसवरुन सध्या देशात नवीन वाद सुरू झाला आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जातीवादावर मोठे विधान केले आहे. पंडित-पुरोहितांनी जात, संप्रदाय निर्माण केला, जे चुकीचे असल्याचे भागवत म्हणाले. भागवत म्हणाले की, आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी नेहमीच घेतला आहे. असा फायदा घेऊन आपल्या देशात परकीय हल्ले झाले. बाहेरच्यांनी याचा नेहमीच फायदा उचलला. जेव्हा आपण आपली उपजीविका करतो तेव्हा समाजाप्रती आपली जबाबदारी असते. जेव्हा प्रत्येक काम समाजासाठी केले जाते, तेव्हा ते काम मोठे किंवा लहान कसे असू शकते? असा प्रश्न भागवत यांनी उपस्थित केला.
संघप्रमुख म्हणाले, देवाने नेहमीच सांगितले आहे की, त्याच्यासाठी सर्व समान आहेत. कोणतीही जात, संप्रदाय नाही, ती पुरोहितांनी निर्माण केली आहे, जे चुकीचे आहे. भागवत म्हणाले की, देशात विवेक, चैतन्य सर्व एक आहेत, त्यात काही फरक नाही, फक्त मते भिन्न आहेत. ते म्हणाले, आपण धर्म बदलण्याचा प्रयत्न केला नाही, जर बदलत असेल तर धर्म सोडला पाहिजे.
वाचा - Yogi Adityanath Interview LIVE: रामचरित मानस वादावर CM योगींनी कडक शब्दांत सुनावलं, म्हणाले...
नोकरीच्या मागे पळणे बंद करा : भागवत
मोहन भागवत म्हणाले की, समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेला संत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जाणत्या लोकांनी विरोध केला. ते पुढे म्हणाले, “अस्पृश्यतेमुळे व्यथित होऊन डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. मात्र, त्यांनी अन्य कोणताही धर्म स्वीकारला नाही आणि गौतम बुद्धांनी दाखवलेला मार्ग निवडला. त्यांची शिकवण भारताच्या विचारातही खोलवर रुजलेली आहे.’’
लोकांना सर्व प्रकारच्या कामाचा आदर करण्याचे आवाहन करून भागवत यांनी नोकरीच्या मागे पळणे थांबवण्यास सांगितले. ते म्हणाले की, जगातील कोणताही समाज 30 टक्क्यांहून अधिक रोजगार निर्माण करू शकत नाही. एका कार्यक्रमात ते म्हणाले, “लोक कोणतेही काम करतात, त्याचा आदर केला पाहिजे. श्रमाचा आदर नसणे हे समाजातील बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. कामासाठी शारीरिक श्रम किंवा बुद्धिमत्ता आवश्यक आहे, त्यासाठी कठोर परिश्रम किंवा 'सॉफ्ट' कौशल्ये आवश्यक आहेत - सर्वांचा आदर केला पाहिजे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rss mohan bhagwat