नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : विकास कामावरून लक्ष हटवण्यासाठी रामचरित मानस याच्यावर विधानं केली जात आहे. लोकसभेमध्ये जेव्हा याचे प्रश्न येईल, तेव्हा त्याचे उत्तर दिले जाईल. रामचरित मानस हे पवित्र ग्रंथ आहे. त्याच्याबद्दल मोठी आस्था आहे, उत्तर भारतातील प्रत्येक घरात मंगल कार्य होते, तेव्हा याचे पठण केले जात असते. रामचरित हे लोकांना जोडणारे आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गावात राम चरित्र मानसाचे वाचण केले जात आहे. रामचरित मानसमध्ये निसाद राज आणि शबरीचे सुद्धा चित्र आहे. हे बुद्धी नसलेल्या लोकांचे कृत्य आहे. ज्या लोकांना राम चरित्र मानसाची माहिती असती तर त्यांनी यावर आक्षेप घेतला नसता, टीका केली नसती, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावलं.
ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 के एडिटर-इन-चीफ राहुल जोशी हे योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचा विकासाच्या ब्लू प्रिंटबद्दल योगी आदित्यनाथ खुलासा केला आहे.
फाळणीच्या मुद्यावर उत्तर प्रदेशच्या जनतेनं खूप काही सहन केलं आहे. फाळणीमुळे आपली ओळख पटवण्याचे कारण सुद्धा सहन केले आहे. उत्तर प्रदेशची जनतेनं कायम विभाजन करणाऱ्या लोकांना फटकारलं आहे. 2014, 2017 मध्ये नाकारलं आणि आता 2019 मध्येही जनतेनं त्यांना नकार दिला आहे. पुढेही देतील, असंही आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावलं.
उत्तर प्रदेशमध्ये इन्फ्रास्टक्चर आहे, NCR शी जोडलेला आहे. पश्चिम आणि दक्षिण भागाला जोडण्यासाठी विमानतळाचे प्रमाण वाढले आहे. देशातील नंबर एकचे वॉटर वेल प्रकल्प आमच्याकडे आहे. एक्सप्रेस हायवेला जोडणारी यंत्रणा उत्तर प्रदेशमध्ये आहे.
मागील 6 वर्षांमध्ये आम्ही 5 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या दिल्या. MSEM आणि विश्वकर्मा श्रम योजनेतून उत्तर प्रदेशात 1 लाख 68 लोकांना जोडलं आहे. पंतप्रधान मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना आणि इतर माध्यमातून 60 लाख लोकांना व्यापाऱ्यांसोबत जोडू शकलो आहे, त्यामुळे आगामी काळात आमच्याकडे अनेक करार होत आहे. पुढील 2 वर्षांमध्ये हे करार तयार होईल, त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, असं आश्वासनही योगी आदित्यनाथ यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.