मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 31 मार्च : तुम्ही अनेकदा बकरीचे दूध काढताना पाहिलं असेल. पण बकरींच्या कळपात राहणारा बकरा जेव्हा दूध देऊ लागतो, तेव्हा त्याला निसर्गाचे आश्चर्य असेच म्हणावे लागेल. ही एक रचलेली कथा आहे, असेच ऐकायला सर्वांना वाटते. पण असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. पण राजस्थानच्या करौलीच्या सपोत्रा तालुक्याच्या गोथरा गावात जेव्हा बकरा दूध देत असल्याचे समोर आले आहे. या बकऱ्याला दूध देताना पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होत आहे. बादशाह नावाचा हा बकरा आहे. त्याचे वय सुमारे 2 वर्षे आहे. हा बकरा कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही. शेळीसारखी दोन स्तन असलेला हा बकरा 24 तासांत 250 ग्रॅम दूध देतो.
बकऱ्याची किंमती आहे माहितीये का? बकऱ्याचा मालक आमिर खान जो 15 वर्षांपासून शेळीपालन करत आहे तो सांगतो की, असा बकरा त्याने पहिल्यांदाच पाहिला आहे. अद्वितीय दूध देणारा बकरा लाखात एक आहे. त्याने हा बकरी करणपूरमधील भैरोगाव येथून 51,000 रुपयांना विकत घेतला होता. आता या बकऱ्याला आमिर खान याच्याकडून एका बांगलादेशी व्यावसायिकाने 1 लाख रुपयांना खरेदी केला आहे. लवकरच हा बकरा बांगलादेशला जाणार आहे, असेही आमिरने सांगितले.
खवय्यांसाठी आवडीची बातमी! ही 56 भोग थाळी 25 मिनिटात संपवा अन् मिळवा हे बक्षीस म्हशीचे दूध पितो हा बकरा - सपोटरा तालुक्यातील गोथरा गावातील पशुपालक आमीर खान यांनी सांगितले की, दूध देणारा हा त्यांचा बकरा बादशाह दररोज म्हशीचे दूध पितो. दुधाबरोबरच धोव, गव्हाचे दाणे आणि भिजवलेले हरभरे, बाभळीच्या झाडाची पानेही तो खातो. वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी ब्रह्मकुमार पांडे यांनी सांगितले की, बकऱ्याचे दूध देणे ही सामान्य गोष्ट नाही. हे लेक्टिन नावाच्या संप्रेरकांमुळे असे होते. मात्र, अशा बकऱ्याने दिलेल्या दुधाचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे व्यावसायिक शेळीपालनात अशा घटनांना महत्त्व नसते. साहजिकच ही घटना दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगितले. अशी केस लाखात एक आढळते.

)







