पुनीत माथुर, प्रतिनिधी
जोधपूर, 31 मार्च : अनेक जणांना वेगवेगळ्या ठिकाणी खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यामध्ये मोठा रस असते. अनेक जण हे खवय्ये असतात, असं म्हणायला हरकत नाही. अशाच खवय्यांसाठी ही बातमी आहे. पश्चिम राजस्थानमधील जोधपूर शहराचे नाव आल्यावर आपल्याला दाल बाटी चुरमा, बडा मिर्ची आणि इथल्या मिठाईची चव आठवते.
पण या या जोधपूर शहरात असे अनेक पदार्थ आहेत, जे तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाहीत. म्हणून आपण आज जोधपूरमधील एका रेस्टॉरंटबाबत जाणून घेऊयात, जिथे तुम्हाला छप्पन भोगची थाळी मिळेल. होय, छप्पन भोगाचे ही थाळी देवासाठी नसून मानवांसाठी आहे.
जोधपूरमध्ये एक म्हण आहे की, खंडे म्हणजे जोधपूरचा दगड आणि खावण खांडे म्हणजे इथले जेवणाचे शौकीन लोक खूप प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे जोधपूरच्या पाचव्या रोडजवळील रसथाल रेस्टॉरंटमध्ये 56 स्वादिष्ट पदार्थांची थाळी आहे. ही 56 भोग थाळी आता जोधपूरमध्ये आकर्षणाचे केंद्र बनत आहे. रसथाल रेस्टॉरंटच्या या थाळीमध्ये 56 प्रकारचे पदार्थ आहेत.
थाळीची किंमत किती -
या 56 वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मिठाई, भाज्या, नमकीन भात आणि पेये यांचा समावेश आहे. थाळी ऑर्डर केल्यानंतर 40 मिनिटांनंतर तुम्हाला ही थाली मिळेल. 2100 रुपयांच्या या थाळीत 5 ते 6 लोक आरामात जेवू शकतात.
25 मिनिटांत कुणी ही थाळी संपवली तर त्याला बक्षीस -
रेस्टॉरंटचे संचालक अर्पित सांगतात की, ही थाळी बनवण्यामागील त्यांचा उद्देश जोधपूरच्या खाद्यप्रेमींना एकाच छताखाली खायचे असलेले सर्व फ्लेवर्स उपलब्ध करून देणे हा आहे. ही थाली कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेशी आहे. विशेष बाब म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने 25 मिनिटांत ही थाळी एकट्याने खाल्ली तर त्याला केवळ एक थाळी मोफत दिली जाणार नाही, तर त्याला 5,100 रुपयांचे बक्षीसही दिले जाईल. अर्पित सांगतात की या 56 स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी त्यांनी खास प्रशिक्षित स्वयंपाकी नेमले आहेत.
जोधपूर येथील छप्पन भोग थाळी चा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही येथे संपर्क साधू शकता:
रसथाल रेस्टॉरेंट, जोधपुर (जलजोग चौराहा)
संचालक : अर्पित शर्मा, 8875421955
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Local18 Food, Rajasthan