हापुड, 18 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापुड जनपदमध्ये एका प्रेमीने प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर स्वत:वरच गोळी झाडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 21 वर्षीय प्रेमीने स्वत:वर गोळी झाडली. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला जनपद येथील एका रुग्णालयात आणण्यात आले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हापुड देहात ठाणे हद्दीतील कोटला येथे राहणारा आरिफ याचे एका मुलीवर प्रेम होते. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर प्रेमीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. त्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या डोक्यात गोळी घातली. सध्या त्याच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याशिवाय तरुणाच्या खिशातून डॉक्टरांना जीवंत काडतूस सापडलं आहे. सांगितले जात आहे की, सोमवारी पहाटे 3 वाजता त्याने आपल्या आईला त्याला शेवटचं पाहून घे, असं सांगितलं. यानंतर तो मुलाचा चेहरा पाहू शकणार नाही, असंही पुढे जाऊन म्हणाला. इतकं म्हणून तो घरातून निघून गेला. कुटुंबीयाला त्याने आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर घरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हा आत्महत्येचा प्रयत्न होता की दुसरं काही याचा तपास सुरू आहे. सध्या या तरुणाच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. हे वाचा - या 5 देशात हेल्थकेअर सर्वात भारी; कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर आणलं नियंत्रण शाकाहारी लोकांना कोरोनाचा कमी धोका; WHO च्या ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य काय?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.