जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गळा आावळून केली हत्या अन् मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला, देहूतील धक्कादायक घटना उघड

गळा आावळून केली हत्या अन् मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला, देहूतील धक्कादायक घटना उघड

गळा आावळून केली हत्या अन् मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला, देहूतील धक्कादायक घटना उघड

या घटनेची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याच्या पथकास मिळाली असता त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

अनिस शेख, देहू, 18 मे : श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात सकाळी 11 वाजताच्या सुमारास पाण्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आलेला आहे. त्या मृत व्यक्तीचे हात-पाय दोरीने बांधले असल्याचं आढळून आलं. तसंच बेल्टने त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आला आहे. मृतदेह पाण्यात बुडावा या हेतूने मोठा दगड बांधून त्या इसमास पाण्यात टाकण्यात आले होते. या घटनेची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याच्या पथकास मिळाली असता त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ चार्जर तसंच मोबाईल आढळून आला आहे. सदर घडलेला प्रकार हा खुनाचा असल्याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने संबंधित 35 वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह पाण्यात टाकला असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे. मयत इसमाकडून मिळालेल्या मोबाईलवरून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम देहूरोड पोलीस करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हेही वाचा- पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा खून, लाकडी दांडक्याने वार करून संपवलं दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकट महाराष्ट्रातही घोंगावत असताना आधीच पोलीस प्रशासनासमोर मोठा ताण आहे. त्यातच खून, मारामारी असे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांसमोर दुहेर आव्हान निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात