मराठी बातम्या /बातम्या /देश /

President Election: 'या' समीकरणामुळे विरोधक NDA ला करू शकतात पराभूत,असं आहे आकड्यांचं गणित

President Election: 'या' समीकरणामुळे विरोधक NDA ला करू शकतात पराभूत,असं आहे आकड्यांचं गणित

President Election:एनडीएविरोधी सर्व पक्ष जर एकत्र आले, तर त्यांच्याकडे एकूण 51 टक्यांपर्यंत मते (Presidential Election Voting) होतील. अर्थात, विरोधकांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे.

President Election:एनडीएविरोधी सर्व पक्ष जर एकत्र आले, तर त्यांच्याकडे एकूण 51 टक्यांपर्यंत मते (Presidential Election Voting) होतील. अर्थात, विरोधकांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे.

President Election:एनडीएविरोधी सर्व पक्ष जर एकत्र आले, तर त्यांच्याकडे एकूण 51 टक्यांपर्यंत मते (Presidential Election Voting) होतील. अर्थात, विरोधकांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे.

नवी दिल्ली, 15 जून: देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै 22 ला संपणार आहे. यामुळे 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक (President Election) पार पडेल. या पार्श्वभूमीवर आज (15 जून 22) दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार कोण असेल याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) यापूर्वीच आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता एनडीए विरोधात तगडा उमेदवार (Presidential Candidate) देण्याचं आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे. काही विशेष समीकरणांचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की विरोधी पक्ष सत्तारूढ एनडीएवर मात करण्याची शक्यता आहे. कोणती आहेत ही समीकरणं? जाणून घेऊया. राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांपैकी 48 टक्के मतं सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या यूपीए आघाडीकडे 23 टक्के मतं आहेत. त्यामुळे जर विरोधकांना ही निवडणूक जिंकायची असेल, तर एकत्र येऊन प्रबळ उमेदवार उभा करावा लागेल. या निवडणुकीत स्थानिक पक्षांची भूमिका मोलाची ठरणार आहे. एनडीएविरोधी सर्व पक्ष जर एकत्र आले, तर त्यांच्याकडे एकूण 51 टक्यांपर्यंत मते (Presidential Election Voting) होतील. अर्थात, विरोधकांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. असं आहे आकड्यांचं गणित राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभेचे सदस्य मतदान (President Election process) करतात. 245 सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेमधील 233 खासदारच मतदान करू शकतात. या वर्षी मात्र जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित असल्यामुळे, काश्मीर कोट्यातली चार राज्यसभा जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यसभेतील एकूण 229 खासदारच या निवडणुकीत मतदान करू शकतील. लोकसभेतील सर्व 543 सदस्य मतदानात सहभागी घेतील. ज्या जागांवर पोटनिवडणुका होत आहेत अशा सदस्यांनाही मतदान करता येईल. यासोबतच सर्व राज्यांचे एकूण 4,033 आमदार देखील या निवडणुकीत मतदान (President Election number game) करतील. अशा रितीने एकूण 4,809 लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत. प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य वेगवेगळे असते. जर सर्व मतदारांच्या मताचे मूल्य एकत्रित केले, तर एकूण मतसंख्या 10 लाख, 86 हजार 431 होते. यातील अर्ध्याहून अधिक, म्हणजेच 5,43,216 मूल्यांची मते मिळालेल्या उमेदवाराची निवड राष्ट्रपतिपदावर केली जाईल. एनडीए-विरोधी पक्षांकडे आहेत किती मतं? भाजपच्या नेतृत्त्वात उभारलेल्या एनडीएकडे सध्या 5,35,000 मूल्यांची मतं आहेत. यामध्ये जेडीयू, एआयडीएमके, अपना दल (सोनेलाल), एलजेपी, एनपीपी, निषाद पार्टी, एनपीएफ, एमएनएफ, एआयएनआर काँग्रेस अशा एकूण 20 लहान पक्षांचा सहभाग आहे. या आकडेवारीनुसार एनडीएला (NDA Vote count) ही निवडणूक जिंकण्यासाठी अवघ्या 13 हजार मतांची गरज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या यूपीएकडे (UPA Vote count) सध्या 2,59,892 मूल्यांची मतं आहेत. यामध्ये शिवसेना, डीएमके, आरजेडी, एनसीपी अशा पक्षांच्या मतांचाही समावेश आहे. तर यूपीए व्यतिरिक्त टीएमएसपी, सपा, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बीजेडी, आप, डावे पक्ष अशा विविध विरोधी पक्षांकडे मिळून एकूण 2,92,894 मूल्यांची मतं आहेत. हे सगळे विरोधी पक्ष जर एकत्र आले, तर एकूण मतांपैकी 51 टक्के मताधिक्य त्यांच्याकडे होऊ शकतं, जे एनडीएसाठी अडचणीचं ठरेल. पटनायक-जगनमोहन रेड्डींची मोठी भूमिका ओडिशामधील सत्ताधारी पक्ष बीजू जनता दल (BJD) आणि आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस (YSR Congress) हे यावेळी किंगमेकर ठरू शकतात. बीजेडीकडे सध्या 31 हजारांहून अधिक मूल्याची मतं आहेत; तर वायएसआरकडे 43 हजारांहून अधिक मूल्याची मतं आहेत. एनडीएला जिंकण्यासाठी केवळ 13 हजार अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक किंवा जगनमोहन रेड्डी यांच्यापैकी कोणीही एनडीएला पाठिंबा दिला, तर एनडीएचा आरामात विजय होऊ शकतो. आज होणार महत्त्वाची बैठक विरोधी पक्ष सध्या अशा उमेदवाराच्या शोधात आहेत, ज्याला सर्व विरोधी पक्षांचा बिनदिक्कत पाठिंबा राहील. यामुळेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सर्व विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र लिहित एकत्रित रणनीती तयार करण्याचे आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर आज (15 जून 22) नवी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक (Opposition meet in Delhi) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, शरद पवार यांच्यासह एकूण 22 नेत्यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीला आठ राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. Corona Virus: चार महिन्यांनंतरच्या Positivity Rate नं वाढवली देशाची चिंता आजपासून राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल भरण्याची मुदत सुरू होत आहे. असं असताना अजून विरोधीपक्षांचा उमेदवारच ठरला नसल्याची स्थिती आहे. तसेच एकूण मतांचे मूल्य पाहता सध्या एनडीएचं पारडं झुकलेलं दिसत आहे. सर्व लहान पक्षांना रुचेल असा उमेदवार उभा करून, विरोधी पक्षांची सर्व मते एकत्र करण्याचं अवघड काम जर विरोधकांना शक्य झालं; तर ते एनडीएसाठी अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत काय होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First published:

Tags: Mamta Banerjee, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या