श्रीनगर, 20 ऑक्टोबर: जम्मू -काश्मीरमधील (Jammu and Kashmir) शोपियानमधील (Shopian) द्रगड परिसरात चकमक (Encounter) सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कारवाई (Police and security forces) करत आहेत. जम्मू -काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत सर्व लोकांना घरातच राहण्यास सांगितलं आहे. परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल पूर्ण सतर्क आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
जवानांचे संयुक्त पथक संशयित जागेच्या दिशेनं निघाले असता, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरु झाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.
हेही वाचा- T20 World Cup: वेस्ट इंडिजला स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का, स्टार खेळाडू टीममधून आऊट
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक मशिदींमधून मुनादीद्वारे लोकांना सतर्क करण्यात आले. सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधातील अंतिम हल्ल्याची तयारी करत आहेत.
लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (MM Naravane) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकी संदर्भात जम्मू प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, त्यांनी नियंत्रण रेषेसह पुढील भागांना भेटी दिल्या आणि सुरु असलेल्या ऑपरेशनचा भाग म्हणून सुरक्षा दलांना अनेक सूचना देण्यात आल्या. यासह, जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनीही रविवारी भींबर गलीला भेट दिली आणि अतिरेक्यांचा लवकरच खात्मा करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा- पुणे: विवाहित बहिणीसोबत भावाचं विकृत कृत्य; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्...
पूंछमध्ये आतापर्यंतचे सर्वात जास्त वेळ ऑपरेशन
एका आठवड्यापासून दहशतवाद्यांचा एक समूहाला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात आतापर्यंत 9 सैनिक शहीद झाले. सूत्रांनी सांगितले की, सोमवारी सकाळीही दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक 11 ऑक्टोबर रोजी पुंछ जिल्ह्यातील देहरा येथील गली भागात झाली. ज्यात जेसीओसह लष्कराचे पाच जवान शहीद झाले. गेल्या 17 वर्षांतील ही या प्रदेशातील सर्वात भीषण चकमक होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Terrorist