मराठी बातम्या /बातम्या /देश /TMCच्या तक्रारीनंतर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरुन मोदींचा फोटो काढणार, निवडणूक आयोगाचा आदेश

TMCच्या तक्रारीनंतर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरुन मोदींचा फोटो काढणार, निवडणूक आयोगाचा आदेश

निवडणूक आयोगानं (Election Commission) आरोग्य मंत्रालयाला नरेंद्र मोदींचा हा फोटो हटवण्यास सांगितलं (Remove PM Modi Photo From Vaccine Certificate) आहे. टीएमसीनं निवडणूक आयोगाकडे अशी तक्रार केली होती, की हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 06 मार्च : कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोबाबत तृणमूल काँग्रेसनं (TMC) तक्रार केली होती. यानंतर आता निवडणूक आयोगानं (Election Commission) आरोग्य मंत्रालयाला नरेंद्र मोदींचा हा फोटो हटवण्यास सांगितलं (Remove PM Modi Photo From Vaccine Certificate) आहे. टीएमसीनं निवडणूक आयोगाकडे अशी तक्रार केली होती, की हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. यानंतर आयोगानं आरोग्य मंत्रालयाला निवडणुकीच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं. आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या एका पत्रात निवडणूक आयोगावं काही नियमांचा हवाला देत सरकारी खर्च आणि जाहिरातींवर प्रतिबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयोगानं कोणत्याही व्यक्तीचं नाव न घेता आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं, की आचारसंहितेच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो न छापण्याच्या नियमाचं मंत्रालयाला पालन करावं लागणार आहे. मात्र, यासाठी आणखी काही वेळ जाईल.

पश्चिम बंगालमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं मंगळवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.यात त्यांनी म्हटलं, की पश्चिम बंगाल आणि इतर काही राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी निवडणूका पाहाता कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो देणं म्हणजे आदर्श आचार संहितेचं उल्लंघन आहे. पक्षानं हा फोटो म्हणजेच मोंदींकडून अधिकारांचा केला जाणार गैरवापर असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल, आसाम,तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी याठिकाणी विधानसभा निवडणुकींच्या घोषणेनंतर 26 फेब्रुवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूलनं तक्रार केली होती.

First published:
top videos

    Tags: BJP, Corona vaccination, Covid19, India, PM narendra modi, West bengal