नवी दिल्ली, 4 एप्रिल: देशभरात कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढत असताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात हा आकडा जलद गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत देशात 3072 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून गेल्या 24 तासांत 13 जणांचा मृत्यू झाला असून त्या कालावधीत 525 नवीन प्रकरणं समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. मात्र अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं जात आहे. परिणामी दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 3072 पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्या 24 तासांत 13 जणांचा मृत्यू झाला असून आणखी 525 नवी प्रकरणं समोर आली आहे. तर 213 जणांचा कोरोनाशी लढा यशस्वी ठरला आहे. त्यामुळे देशभरात कोरोना बळावत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण देशातील 3075 रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधित म्हणजे 490 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्लीत 445 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित - निजामुद्दीन परिषदेतील 441 लोकांमध्ये Coronavirus ची लक्षणं; 2000 जण क्वारंटाइन देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले राज्य राज्य रुग्णसंख्या मृत्यू महाराष्ट्र 490 24 दिल्ली 445 6 केरळ 295 2 राजस्थान 200 0 उत्तर प्रदेश 174 2 देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. मात्र अद्यापही अनेकजण लॉकडाऊनचं उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचं पालन करावं असं वारंवार सांगितलं जात आहे. नागरिकांचा पाठिंबा नसल्याचे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित - Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती?

)







