'Work from Home' मुळे वाढतोय सायबर क्राइमचा धोका, 80 टक्के कंपन्या सुरक्षा देण्यास असमर्थ

कोरोना व्हायरस (Coronavirus)चे वाढते प्रमाण रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work from Home दिले. मात्र यादरम्यान सायबर क्राइमचा धोका रोखण्यासाठी देशातील 80% कंपन्यांकडे उपाययोजना नाही आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus)चे वाढते प्रमाण रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास (Work from Home) सांगितले आहे. मात्र यादरम्यान सायबर क्राइमचा धोका वाढला आहे आणि हा धोका रोखण्यासाठी देशातील 80 टक्के कंपन्यांकडे पूर्णपणे उपाययोजना उपलब्ध नाही आहे. या कंपन्यांचे कंम्प्यूटर्स, इंटरनेट आणि कामकाजाची पद्धत अशी आहे की, त्या कधीही सायबर हल्ल्याच्या बळी पडू शकतात. केवळ 20 टक्के कंपन्या सायबर क्राइम अंतर्गत झालेला हल्ला झेलण्याची क्षमता ठेवतात. फिक्की आणि अन्स्ट अँड यंग (E&Y) च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, देशातील 80 टक्के कंपन्यांचे सर्व्हर, नेटवर्क आणि इंटरनेटशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दोष आहेत.

अनेक कंपन्यांमध्ये पेनड्राइव्ह वापरण्याचीही सूट दिली जाते, तर वायफायचा पासवर्ड देखील सर्वांना माहित असतो किंवा काही ठिकाणी ओपन नेटवर्क असतं. त्यामुळे धोका वाढतो

(हे वाचा-नोकरी गेली तरी नो टेन्शन! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार)

जगभरात कोरोना व्हायरसचा धोका असताना सायबर क्राइमचा धोका देखील वाढत आहे. कारण काही बनावट आणि स्पॅम लिंक पाठवून लोकांची फसवणूक केली जात आहे. या लिंकवर क्लिक केल्याने तुमची पूर्ण सिस्टिम हॅक करण्यात येऊ शकते. काहीठिकाणी अशा घटनाही आढळून आल्या आहेत की, हॅकरने सिस्टिम हॅक केल्यानंतर संबधित व्यक्तीचे आर्थिक नुकसान झाले आहे किंवा त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे.

(हे वाचा- मोदी सरकारकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी,11 मेपासून करू शकता गुंतवणूक)

कोरोनाच्या संकट काळात वर्क फ्रॉम होम कल्चर लोकांनी आत्मसात करण्यास सुरूवात केली आहे. घरातून काम करताना एखादी समस्या उद्भवल्यास त्याचे निदान हेल्प डेस्कच्या माध्यमातून केले जाते. मात्र अशावेळी हेल्प डेस्ककडून सर्वच समस्यांचे समाधान होत नाही. अशावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या माहितीनुसार कोणतेही सॉफ्टवेअर सिस्टिममध्ये डाऊनलोड केल्यास सुरक्षा विषयक धोका वाढतो. व्हायरस एकदा तुमच्या कंम्प्यूटरमध्ये घुसल्यास संपूर्ण सिस्टिम खराब होण्यास वेळ लागत नाही.

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2020 01:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading