मराठी बातम्या /बातम्या /देश /'पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल' आयोजित करणाऱ्या हॉटेलवर बजरंग दलाचा हल्ला, बॅनरला लावली आग

'पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल' आयोजित करणाऱ्या हॉटेलवर बजरंग दलाचा हल्ला, बॅनरला लावली आग

Crime News: बजरंग दल संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका हॉटेलवर हल्ला (Bajrang Dal attacks on restaurant) केल्याची घटना समोर आली आहे.

Crime News: बजरंग दल संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका हॉटेलवर हल्ला (Bajrang Dal attacks on restaurant) केल्याची घटना समोर आली आहे.

Crime News: बजरंग दल संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका हॉटेलवर हल्ला (Bajrang Dal attacks on restaurant) केल्याची घटना समोर आली आहे.

सूरत, 14 डिसेंबर: बजरंग दल संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका हॉटेलवर हल्ला (Bajrang Dal attacks on restaurant) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित हॉटेलमध्ये 'पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल'चं आयोजन (restaurant host Pakistani Food Festival) करण्यात आलं होतं. याबाबत माहिती देणारं बॅनर देखील हॉटेलच्या बाहेर लावण्यात आलं होतं. हा प्रकार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, कार्यकर्त्यांनी संबंधित हॉटेलवर हल्ला केला आहे. कार्यकर्त्यांनी हॉटेलवर लावलेला एक मोठा बॅनर खाली उतरवून त्याला आग लावली (sets banner on fire) आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम'चे नारे देखील लावले आहेत.

बजरंग दलाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं असा दावा केला की, संबंधित रेस्टॉरंटने आपली चूक मान्य केली आहे. हे रेस्टॉरंट गुजरातमधील सूरत येथील रिंगरोड परिसरात आहे. संबंधित रेस्टॉरंटमध्ये 12 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान 'टेस्ट ऑफ इंडिया' नावाचा एक महोत्सव होणार होता. यामध्ये 'पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल'चं देखील आयोजन करण्यात येणार होतं. त्यासाठी एक मोठं बॅन रेस्टॉरंटच्या बाहेर लावण्यात आलं होतं.

हेही वाचा-महिलेनं स्वत:च पुसलं कुंकू; वडिलांनीही दिली साथ, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारचे उत्सव आयोजित केले जाणार नाहीत. अशा महोत्सवाचे आयोजन बजरंग दलाकडून खपवून घेतलं जाणार नाही. अशी प्रतिक्रिया बजरंग दलाच्या दक्षिण गुजरात युनिटचे अध्यक्ष देवीप्रसाद दुबे यांनी दिली आहे.

हेही वाचा-नाशकात मध्यरात्री हाणामारीचा थरार; मिठी मारल्याने वादाला फुटलं तोंड

'टेस्ट ऑफ इंडिया' चालवणाऱ्या शुगर अँड स्पाईस रेस्टॉरंट्सचे संचालक संदीप डावर यांनी सांगितलं की, रेस्टॉरंटमध्ये मुघलाई खाद्यपदार्थ बनवणं सुरू राहिलं. काही लोकांच्या भावना दुखावल्यामुळे संबंधित कार्यक्रमातून "पाकिस्तानी" हा शब्द काढून टाकण्यात येईल. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

First published:

Tags: Crime news, Gujrat, Surat