मुंबई, 22 ऑक्टोबर : भारतातील प्रसिद्ध औषध कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजवर (Dr. Reddy’s Laboratories) सायबर अटॅक (cyber attack) झाला आहे. नुकतीच या कंपनीला भारतात रशियन लशीचं ट्रायल करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. डॉ. रेड्डीज कंपनीने आपले जगभरातील डेटा सेंटर्स आयसोलेट केले आहेत. सायबर अटॅक झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. कंपनीने याबाबत स्टॉक एक्सजेंड फाइलिंगमार्फत माहिती दिली आहे. सायबर हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून सर्व डेटा सेंटर्स आयसोलेट करण्यात आले आहेत जेणेकरून आवश्यक पावलं उचलली जातील. मीडिया रिपोर्टनुसार भारत, ब्राझील, रशिया, यूके आणि अमेरिकेतील प्लांट्सवर सायबर हल्ल्याचा परिणाम झाला आहे. डॉ. रेड्डीजे सीआयओ मुकेश राठी यांनी सांगितलं, पुढील 24 तासांत आमच्या सर्व सेवा सामान्य होण्याची शक्यता आहे. सायबर अटॅकनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारी दुपारी 12.30 वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) 1.49 टक्के तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) 1.42 टक्के घसरण झाल्याचं दिसलं. हे वाचा - मोठी बातमी! ऑक्सफोर्ड कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच Sputnik V लशीचं भारतात ट्रायल करण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज कंपनीला परवानगी दिली आहे. रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने Sputnik V ही लस तयार केली आहे. रशियामध्ये सध्या या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. भारतातही या लशीचं ट्रायल करण्यासाठी भारताच्या डॉ. रेड्डीज कंपनीने रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडशी (RDIF-Russian Direct Investment Fund) करार केला आहे. भारतात या लशीचं ट्रायल करण्यासाठी डॉ. रेड्डीजने डीजीसीआयकडे अर्ज केला होता. डीजीसीयीआने सुरुवातीला परवानगी दिली नाही. त्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा अर्ज केला आणि आता या लशीच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केलं जाणार आहे. हे वाचा - भारतातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार का कोरोना लस? काय आहे तज्ज्ञांचं मत “पूर्ण प्रक्रियेत DCGI च्या मार्गदर्शनांचा आम्ही स्वीकार करत आहोत. भारतात आम्हाला ट्रायल सुरू करायला परवानगी मिळाली ही खूप मोठी बाब आहे. महासाथीचा सामना करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असं डॉ. रेड्डी लेबोरेटरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि को-चेअरमन जीव्ही प्रसाद यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.