भारतातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार का कोरोना लस? काय आहे तज्ज्ञांचं मत

भारतातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार का कोरोना लस? काय आहे तज्ज्ञांचं मत

कोरोना लस (corona vaccine) आल्यानंतर ती कुणाला आणि कशी मिळेल याबाबत तज्ज्ञ काय सांगतात वाचा.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : जगभरात अनेक कोरोना लशीचं (corona vaccine) ट्रायल सुरू आहे. त्यापैकी मोजक्या लशी क्लिनिक ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. भारतातही कोरोना लशींचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. काही लशींचे परिणाम खूपच सकारात्मक पाहायला मिळत आहेत. 2021 सालच्या सुरुवातीलाच लस मिळेल अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रत्येक भारतीयाला ही लस उपलब्ध होणार का? प्रत्येकापर्यंत ही लस कशी पोहोचणार असा प्रश्न उपस्थित होतो.

आतापर्यंत भारतातील लसीकरणाची कामगिरी चांगली असून, एकदा कोविड-19 ची लस तयार झाली की भारतातील कोल्ड चेन नेटवर्कचा देशात लशीचा पुरवठा करण्यासाठी उपयोग होईल असं मत टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे संचालक आणि सुप्रसिद्ध व्हॅक्सिनॉलॉजिस्ट डॉ. पीटर होटेझ यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

भारतात प्रतिकारशक्तीसंबंधी प्रयत्नांत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नेटवर्कचा वापर केला जात असून तो फायदेशीर ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. पीटर नेमकं काय काय म्हणाले आहेत पाहुयात.

भारतात कोविड-19 लशीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नेटवर्कची किती गरज आहे?

भारतात कमीतकमी चार ते पाच लशी वितरित होतील ही एक अडचणच आहे. सीरम इन्स्टिट्युटची अ‍ॅडेनोव्हायरस, भारत इनअ‍ॅक्टिव्हेटेड व्हायरस, बायो ई- रिकॉम्बिनंट प्रोटिन (बायलर कॉलेजच्या सहकार्याने बनवलेली), बायो ई- जे अँड जे अ‍ॅडेनोव्हायरस आणि रशियाची गेमिलिया अ‍ॅडिनोव्हायरस या लशी भारतात दिल्या जाऊ शकतात. यामुळे लशीचा सुरक्षितता हे आव्हानात्मक आहे. यात इलेक्ट्रॉनिक नेटवर्क मदत करू शकतं.

भारतासारख्या देशात लशींचं वितरण आणि कोल्ड स्टोरेज करण्याचं आव्हान किती मोठं आहे?

भारताने लसीकरण आणि कोल्ड स्टोरेज चेनच्या माध्यमातून त्याचं वितरण करण्याची कामगिरी आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे त्यामुळे कदाचित त्याचा यावेळी उपयोग होईल.

म्हणजे ती लस उपलब्ध होणं म्हणजे केवळ अर्धीच लढाई जिंकल्यासारखं आणि स्टोरेज, वितरण ही आणखी मोठी आव्हान आहेत का?

स्थानिक उत्पादन, क्लिनिकल टेस्टिंग, मॉनिटरिंग, वितरण आणि फार्माकोव्हिजिलन्स या प्रत्येक घटकाशी संबंधित स्वतंत्र आव्हानं आहेत आणि त्यांचा एक अब्ज लोकसंख्येशी गुणाकार करा तितकी आव्हानं आहेत.

हे वाचा - खूशखबर! जगात 4 CORONA VACCINE तयार! आणखी 2 लशींना याच वर्षात मिळणार मंजुरी

भारत बहुसंख्य लोकांना लस देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का?

हो, पण हे लक्षात घ्यायला हवं की, या लशींची लहान मुलांवरील परिणामकारकता आणि सुरक्षितता याबद्दल आपल्याकडे अभ्यासच उपलब्ध नाही.

आपण लशीवर विनाकारण अवलंबून राहतोय का?

मोठ्या शहरांत विशेष करून तिथल्या झोपडपट्ट्यांमध्ये मास्कवर अवलंबून राहणं आव्हानात्मक आहे. अमेरिकेत काय किंवा भारतात काय ही सत्य परिस्थिती आहे. अमेरिकेत आमचे नेतेच मास्क वापरत नाहीत ही आणखी एक समस्या आहे. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी किंवा जनतेला वाचवण्यासाठी आमच्याकडे केवळ लसीकरणाचाच पर्याय उपलब्ध आहे.

भारताने नाकारलेल्या ह्युमन चॅलेंज ट्रायल्सबाबत तुमचं काय मत आहे?

भारतात आणि जगभर होत असलेल्या कोरोनाच्या संक्रमणाचा विचार करता लशी परिणामकारक ठरतील का, हे तपासण्यासाठी ह्युमन चॅलेंज ट्रायल्सची आवश्यकता मला तरी वाटत नाही. भविष्यात गरज पडली तर पायाभूत सुविधा उभारल्यावर आपण कदाचित कमी पॅथोजेनिक अल्फा किंवा बीटा कोरोना विषाणूंसाठी ह्युमन चॅलेंज स्टडी सुरू करू. ह्युमन चॅलेंज ट्रायल्स पटकन निष्कर्ष देत नाहीत त्या पूर्ण होण्यासाठी महिने किंवा वर्षं लागू शकतात.

हे वाचा - मेड इन इंडिया स्वस्त कोरोना टेस्ट तयार; फक्त Paper ने तासाभरात कोरोनाचं निदान

लशींच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या भीतीतून लसीकरणाविरोधी चळवळी जगभरात सुरू झाल्या आहेत. याबाबत तुमचं काय मत आहे?

लस येण्याआधी त्याबाबत सरकारी आणि खासगी क्षेत्रातून माहिती देणं किती महत्त्वाचं आहे, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण आपल्याला एक पाऊल पुढं टाकायला हवं. अमेरिकेत लसीकरणाविरुद्धच्या चळवळीत नाटकीय स्वरूपात प्रचंड वाढ झाली असून ती विज्ञानविरोधी चळवळ होऊ पाहते आहे आणि अफवा पसरवत आहे याची मला चिंता आहे. ही चळवळ आता युरोपीय देशांच्या राजधान्यांत पोहोचली असून भारतासह इतरत्रही पोहोचू शकेल. मला वाटतं आपण केवळ लसीकरणाचा प्रसार न करता विज्ञानाविरुद्ध गैरसमज पसरवणाऱ्यांचा विरोध केला पाहिजे. यामध्ये रशियाच्या सरकारचाही समावेश आहे. रशियाच्या सरकारने लशीविरुद्धच्या संदेशांचा पूर सोशल मीडियावर आणला आहे. या माहितीला वैज्ञानिक अभ्यासांमध्ये weaponized health communication असा उल्लेख करण्यात आला असून, दुर्दैव म्हणजे UN शी संबंधित संस्था, G7 किंवा G20 देशांपैकी कुणीही या चळवळींविरुद्ध कारवाई केल्याचं दिसत नाही.

आणीबाणीच्या काळात या लशीचा वापर करण्यासंबंधी (Emergency Use Autorization, EUA) भारतात काय होईल असं तुम्हाला वाटतं?

भारतात EUA ची पद्धत काय आहे मला माहीत नाही. अमेरिकेत जर काळाची गरज आणि जीव वाचवायची बाब असेल तर आम्ही EUA प्रक्रिया पूर्ण करून परवानगी देतो.

Published by: Priya Lad
First published: October 22, 2020, 8:52 AM IST

ताज्या बातम्या