जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / मोठी बातमी! ऑक्सफोर्ड कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू

मोठी बातमी! ऑक्सफोर्ड कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू

त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.

त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात महत्त्वाची लस समजली जाणारी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca तयार केलेल्या या लशीच्या चाचणीला या घटनेनंतर मोठा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लवकर लस उपलब्ध व्हावी याकडे सर्वांची प्रतीक्षा असतानाच आता एका मोठी बातमी समोर आली आहे. सर्वांचं लक्ष लागलेल्या ऑक्सफोर्डनं तयार केलेल्या कोरोना लशीची चाचणी सध्या सुरू आहे. या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाविरूद्धच्या लढातील सर्वात महत्त्वाची लस समजली जाणारी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca तयार केलेली कोरोना लशीची सध्या जगभरात चाचणी सुरू आहे. या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू झाला असून ही चाचणी थांबली जाणार नाही असंही सांगितलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातल्या 12 लशी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यापैकी ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेली ही लस सर्वोत्तम असल्याचा दावा केला जात असतानाच ही घटना समोर आली आहे. ब्राझिलच्या आरोग्य आणि प्राधिकरण विभागानं दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कोरोना लशीच्या चाचणीत सहभागी झालेल्या एका वॉलेंटियरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस नाही असंही या विभागाकडून सांगण्यात आलं असून लशीची चाचणी थांबवली जाणार नाही ती सुरू राहिल अशी माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असली तरी या वॉलेंटिरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याबाबत अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. हे वाचा- पंतप्रधान मोदींनंतर मुख्यमंत्र्यांनीही केलं जनतेला सावध; सणासुदीत या गोष्टी टाळा फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाओलोच्या मदतीने ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरस लस एझेडडी 222 च्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचण्या सुरू आहेत. मृत्यू झालेल्या स्वयंसेवक ब्राझीलचा असल्याची माहिती विद्यापीठाने दिली. ब्लूमबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 वर्षीय वॉलेंटियरला लस देण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याला चाचणी देण्यात आली नव्हती.अमेरिका आणि भारतातही काही काळासाठी थांबवली होती कोरोना लशीची चाचणी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्डचा चाचणीदरम्यान सप्टेंबर महिन्यात एका वॉलेंटियरची तब्येत बिघडली आणि त्यानंतर जगभरात होणारी चाचणी काही काळासाठी थांबवण्यात आली होती. अमेरिकेतही आता एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) सुरक्षिततेच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर चाचणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. भारतातही मध्यंतरी याची चाचणी थांबवण्यात आली होती. मात्र सीरम इन्स्टिट्यूटनं नंतर पुन्हा एकदा परवानगी घेऊन ही चाचणी सुरू केली आहे. आता ब्राझीलमध्ये घडलेल्या या घटनेनंतर कोरोना लशीच्या चाचणीबाबत जगभरात काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात