सरगुजा, 28 नोव्हेंबर : छत्तीसगडमधील (Chattisgard) सरगुजा जिल्ह्यात एका पत्नीने पतीवर धर्मपरिवर्तनाचा दबाव करीत असल्याचा आरोप केला आहे. अम्बिकापुर निवासी मधुमिता विश्वास याचंं म्हणणं आहे की, तिचा पती अमित विश्वास तिला जबरदस्ती इस्लाम धर्म स्वीकार करण्याची जबरदस्ती करीत आहे. इतकच नाही जेव्हा महिलेने याचा निषेध केला त्यानंतर पती तिच्यावर अत्याचार करीत आहे.
मधुमिताने सांगितलं की, तिच्या पतीने केव्हा मुस्लीम धर्माचा स्वीकार केला याची माहिती नाही. तिच्या मुलीच्या जन्मानंतर त्याने मुलीचं नाव मुस्लीम धर्मावर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर पत्नीने विरोध केला असता अमितने इस्लाम कबूल केल्याची माहिती दिली. इतकच नाही तर तो इस्लामचा प्रचार करीत असल्याचं त्याने सांगितलं. मुलाला मुस्लीम बनवण्याची इच्छा
मधुमिताने सांगितलं की, त्यांचा 14 वर्षांचा मुलगाही आहे. ज्याचं नाव तनीश आहे आणि अमित त्याचं धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करीत आहे.
हे ही वाचा-असदुद्दीन ओवैसींनी 5 हिंदू उमेदवारांना दिलं तिकिट, असं असणार MIM चं समीकरण
घरात ठेवलेल्या देवी-देवतांच्या प्रतिमेवर आक्षेप
मधुमिताने सांगितलं की, अमित तिच्यावर घरात ठेवलेल्या हिंदू देव-देवतांची प्रतिमा हटविण्यासाठी दबाव आणत आहे. असं केलं नाही म्हणून अमितने तिला मारहाण केली. आरोपीने 19 नोव्हेंबर 2020 रोजी घरातील गॅस पाइप लाइन कापून जीव घेण्याचाही प्रयत्न केला.
पीडिताने आपल्या पतीवर मुस्लीम तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. तिचं म्हणणं आहे की, आरोपी पतीने इस्लाम धर्माचा अनुयायी असतानाही धोका देऊन तिच्याशी लग्न केलं. याबाबत मधुमिताने भोपाळमधील सुखी सेवानिया ठाण्यात गुन्हा दाखल केला असून न्यायाची मागणी केली आहे. झी न्यूजने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.
पीडिताने अमितसोबत केलं दुसरं लग्न
अमित विश्वास भोपाळ नगर निगममध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर आहे. तर मधुमिता विश्वास ही व्यवसायाने होमियोपॅथी डॉक्टर आहे. पीडितेच्या लग्नानंतर काही वर्षात तिच्या पतीचं निधन झालं होतं. ज्यानंतर 5 ऑक्टोबर 2013 मध्ये अमित विश्वाससोबत दुसरं लग्न केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love jihad