मराठी बातम्या /बातम्या /देश /

असदुद्दीन ओवैसींनी 5 हिंदू उमेदवारांना दिलं तिकिट, असं असणार MIM चं समीकरण

असदुद्दीन ओवैसींनी 5 हिंदू उमेदवारांना दिलं तिकिट, असं असणार MIM चं समीकरण

 जुन्या हैदराबादमध्ये एमआयएमचा दबदबा आहे. या भागातील 51 जागांवर एमआयएमनी उमेदवार दिले आहेत. या वेळी पाच जागांसाठी पक्षाने हिंदू उमेदवार दिले आहेत.

जुन्या हैदराबादमध्ये एमआयएमचा दबदबा आहे. या भागातील 51 जागांवर एमआयएमनी उमेदवार दिले आहेत. या वेळी पाच जागांसाठी पक्षाने हिंदू उमेदवार दिले आहेत.

जुन्या हैदराबादमध्ये एमआयएमचा दबदबा आहे. या भागातील 51 जागांवर एमआयएमनी उमेदवार दिले आहेत. या वेळी पाच जागांसाठी पक्षाने हिंदू उमेदवार दिले आहेत.

हैदराबाद, 28 नोव्हेंबर: काँग्रेसची मक्तेदारी असलेल्या मुस्लिम मतांवर हक्क सांगणारा आणखी एक पक्ष गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात प्रभावी ठरतोय. त्याचं नाव आहे असददुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्ष. खरं तर या पक्षाची स्थापना 1927 सालची आहे आणि 1984 पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघात हा पक्ष विजयी होत आला आहे. पण राष्ट्रीय स्तरावर पक्ष कुणाला माहीत नव्हता. ओवेसी यांनी आपल्या करिश्म्याने 'मुस्लिमांचा कैवार घेणारा देशातला एकमेव नेता' अशी आपली प्रतिमा तयार केली. त्यांनी इतकी वर्षं केवळ आंध्र प्रदेश, तेलंगाणातील राज्यस्तरीय पक्ष अशी प्रतिमा बदलून राष्ट्रीय पक्ष अशी प्रतिमा तयार केली आहे.

याच ओवेसींचा बालेकिल्ला आहे हैदराबाद. इथली महानगरपालिका म्हणजे तर त्यांच्या ‘इज्जत का सवाल’ आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आमदार निवडून आणल्यानंतर ओवेसींनी जाणीवपूर्वक अशा मतदारसंघांतून निवडणूक लढवली आहे जिथला विजयी उमेदवार ठरवण्यात मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक असेल.

हैदराबाद महापालिकेची निवडणूक

हैदराबाद महानगरपालिकेतही त्यांनी यावेळी तीच रणनीती ठेवली आहे. जुन्या हैदराबादमध्ये एमआयएमचा दबदबा आहे. या भागातील 51 जागांवर एमआयएमनी उमेदवार दिले आहेत. या वेळी पाच जागांसाठी पक्षाने हिंदू उमेदवार दिले आहेत. ज्या भागात हिंदू आणि मुस्लिम मतदारांची समान संख्या आहे आणि तो भाग एमआयएमच्या आमदाराच्या विधानसभात मतदार संघात येतो अशाच ठिकाणी हे हिंदू उमेदवार देण्यात आले आहेत.

पुराना पूल वॉर्डातून सुन्नम राज मोहन, फलकनुमामधून थारा भाई, कारवाँतून मंदागिरी स्वामी, जामबागेतून जाडला रवींद्र आणि रंगारेड्डीनगरमधून (कुतुबुल्लापूर) एतियाला राजेश गौड यांना तिकिट देण्यात आलं आहे. 2016 च्या निवडणुकीत एमआयएमने चार हिंदू उमेदवार दिले होते त्यापैकी कारवाँतून राजेंद्र यादव आणि जामबाग वॉर्डातून मोहन निवडून आले होते. कारवाँ नगरमध्ये हिंदू आणि मुस्लिम उमेदवारांची संख्या समान असून, तिथं भाजप, टीआरएस आणि काँग्रेसने हिंदू उमेदवार दिला आहे त्यामुळे ओवेसींनीही हिंदू उमेदवार देऊन चुरस वाढवली आहे. फलकनुमा वॉर्ड अनुसूचित जातींच्या महिलांसाठी आरक्षित आहे. इथंही हिंदू-मुस्लिम मतदारांची संख्या समान आहे त्यामुळे लढत चुरशीची होईल. या वेळी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहांपासून बड्याबड्या नेत्यांनी या महानगरपालिका निवडणुकीत प्रचार केला आहे.

हैदराबाद पालिका निवडणुकीत 2016 मध्ये काय होती परिस्थिती

महापालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत 150 पैकी 99 जागा टीआरएसनी जिंकल्या होत्या. ओवेसींच्या एमआयएमने 60 जागा लढवून 44 जिंकल्या होत्या. भाजपला 3, काँग्रेसला 2 वॉर्डांतच विजय मिळाला होता. केसीआर आणि जुन्या हैदराबादमध्ये एमआयएमचंच वर्चस्व होतं.

आतापर्यंत एमआयएमने विजय मिळवला त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवारच दिले होते. मुस्लिमबहुल ठिकाणीच आपलं राजकारण करणारा एमआयएम पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होऊ पाहतोय. एमआयएमने 2014 मध्ये तेलंगणात 7 2019 मध्ये महाराष्ट्रात 2 आणि 2020 मध्ये बिहारमध्ये 5 आमदार निवडून आणले आहेत. पक्षाचे नेते ओवेसी हे नेहमी संसदेत बाबरी मशीद, तीन तलाक, लव्ह जिहाद, नागरिकता संशोधन कायदा, एनआरसी असे अनेक मुद्दे वेळोवेळी मांडत आले आहेत, ज्यांचा थेट संबंध मुस्लिमांशी आहे. पश्चिम बंगालमधील 30 टक्के मुस्लिम जनतेच्या आधारे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी ते सध्या करत आहेत.

First published:

Tags: Asaduddin owaisi