जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, कोरोना रुग्णांनी सहा महिन्यांनंतर वॅक्सिन घ्यावं, NTAGI चा सल्ला

कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, कोरोना रुग्णांनी सहा महिन्यांनंतर वॅक्सिन घ्यावं, NTAGI चा सल्ला

कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, कोरोना रुग्णांनी सहा महिन्यांनंतर वॅक्सिन घ्यावं, NTAGI चा सल्ला

NTAGI ने दिलेल्या माहितीनुसार, Covishield च्या दोन डोसदरम्यानचं अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे केलं जावं असा सल्ला दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मेc: जर तुम्ही सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना वॅक्सिन कोविशिल्डचा पहिला डोस घेतला असेल, तर दुसऱ्या डोससाठी आता अधिक वाट पाहावी लागू शकते. कोरोना वॅक्सिनच्या कमतरतेदरम्यान, लसीकरणावर गठित सरकारी पॅनल, नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुप अर्थात NTAGI ने लशीबाबत काही शिफारसी केल्या आहेत. NTAGI ने दिलेल्या माहितीनुसार, Covishield च्या दोन डोसदरम्यानचं अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे केलं जावं असा सल्ला दिला आहे. तसंच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रिकव्हरीनंतर 6 महिन्यांनी वॅक्सिन दिलं जावं अशीही शिफारस या पॅनलकडून करण्यात आली आहे. तसंच, गर्भवती महिलांना कोरोनाची लस घेण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो आणि प्रसूतीनंतर कोणत्याही वेळी स्तनपान देणाऱ्या महिलांनाही कोरोना लस दिली जाऊ शकते, असा सल्लाही एनटीएजीआयने दिला आहे. त्याशिवाय कोरोना संक्रमितांनी रिकव्हरीनंतर सहा महिन्यांपर्यंत कोरोना लसीकरण करू नये, असंही सांगण्यात आलं आहे.

जाहिरात

रिकव्हरीनंतर तीन महिन्यांनी लस घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला - एनटीएजीआयच्या शिफारशीपूर्वी, आतापर्यंत Covishield लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांमध्ये घेण्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. डॉक्टरांनी कोरोनामधून रिकव्हर झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच सीडीसी यूएसच्या गाइडलाइन्समध्येही कोरोनामधून रिकव्हर झाल्यानंतर 90 दिवसांनी लस घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, ज्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

(वाचा -  Black fungus वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; भारतीय डॉक्टरचा दावा )

कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं - NTAGI ने कोविशिल्ड लशीच्या दोन डोसदरम्यान 12 ते 16 आठवड्यांचा गॅप असावा असा सल्ला दिला आहे. सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर चार ते आठ आठवड्यांचं आहे. या पॅनलद्वारा करण्यात आलेल्या शिफारसी आता राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडे पाठवल्या जातील, NTAGI पॅनलद्वारा कोवॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत कोणताही बदल सुचवला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात