जाहिरात
मराठी बातम्या / देश / जन्मापासून एकमेकींना जोडल्या गेलेल्या 2 बहिणी; वेगळं करण्यासाठी 9 तास चालली सर्जरी अन् शेवटी...

जन्मापासून एकमेकींना जोडल्या गेलेल्या 2 बहिणी; वेगळं करण्यासाठी 9 तास चालली सर्जरी अन् शेवटी...

जुळ्या बहिणींना केलं वेगळं

जुळ्या बहिणींना केलं वेगळं

दोन्ही बहिणी छाती आणि पोटाच्या वरच्या बाजूला जोडल्या गेल्या होत्या. थोडक्यात सांगायचं झालं तर, एका शरीरात दोन आत्मे होते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 जुलै : बरेलीचे रहिवासी अंकुर गुप्ता आणि दीपिका गुप्ता यांना त्यांची होणारी बाळं एकमेकांना जोडली गेली असल्याचं कळताच धक्का बसला. ते दोघंही घाबरले होते. पण दिल्ली एम्सच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या जुळ्या मुलींच्या उपचारासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. अखेर डॉक्टरांनी जन्मापासूनच जोडलेल्या मुलींना नवजीवन दिलं. रिद्धी-सिद्धी नावाच्या या दोन बहिणींचा जीव आता धोक्याबाहेर आहे. दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी जन्मावेळीच जोडलेल्या दोन जुळ्या मुलींना वेगळं केलं आहे. दोन्ही बहिणी छाती आणि पोटाच्या वरच्या बाजूला जोडल्या गेल्या होत्या. थोडक्यात सांगायचं झालं तर, एका शरीरात दोन आत्मे होते. या शस्त्रक्रियेत यकृत आणि हृदयाचे भाग वेगळे करणं हे डॉक्टरांसाठी सर्वात आव्हानात्मक होतं. मुली जेव्हा आईच्या पोटात होत्या तेव्हा पाचव्या महिन्यातच दोन्ही मुली एकमेकींना जोडल्या असल्याचं कळालं होतं, असं सांगण्यात आलं. या दोन्ही मुलींचा जन्म दिल्ली एम्समध्येच झाला होता. दोघी 11 महिन्यांच्या झाल्या तेव्हा त्यांना वेगळे करण्यासाठी 11 जून रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अरेच्चा, चोरी झालेलं सामान आपोआप परत मिळतं? नेमकी भानगड काय? रिद्धी-सिद्धी यांना नवजीवन देण्यासाठी एम्समधील सर्जनची टीम जवळपास 9 तास काम करत होती. 9 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत दोन्ही बहिणी विभक्त झाल्या. यावेळी कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. कारण एक छोटीशी चूक झाली असती तर दोघींच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता. ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टीममध्ये विविध विभागातील डॉक्टरांचा समावेश होता . दिल्ली एम्समध्ये करण्यात आलेली ‘बर्थ डिफेक्ट सर्जरी’ ही अशी तिसरी यशस्वी एकत्रित शस्त्रक्रिया आहे. मुलींच्या जन्माआधीच या दोघी जोडल्या गेल्या असल्यचाी माहिती मिळाली होती. या मुलींचा जन्मही 23 जुलै 2022 रोजी दिल्ली एम्समध्ये झाला होता. बरोबर एक वर्षानंतर दोघींनाही डॉक्टरांनी पुन्हा नवजीवन दिलं आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार मुलींच्या पालकांनी सांगितलं की, जेव्हा त्यांना समजलं की मुली एकमेकांशी जोडल्या आहेत, तेव्हा ते खूप घाबरले होते. परंतु एम्सच्या डॉक्टरांनी मुलींना वेगळं केलं जाऊ शकतं, असं आश्वासन दिलं. या मुली 11 महिन्यांपासून एकमेकींसोबत जोडल्या गेल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात